![]() |
रामु गावडे (जखमी) |
अडकूर / प्रतिनिधी
अडकूर (ता. चंदगड) येथून मलगेवाडीकडे राज्य मार्ग क्रं 189 वरुन जात असताना मलगेवाडी फाट्यावर प्रवास करताना दुचाकीवर रस्त्याकडेचे मोठे झाड पडल्याने आमरोळी येथील रामू सतबा गावडे (वय -55) गंभीर जखमी झाले. आज दुपारी दीड वाजता हि घटना घडली.
![]() |
अडकूर जवळील मलगेवाडी (ता. चंदगड) येथील फाट्यावर
झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने एकजण गंभीर जखमी झाले.
|
रामु गावडे आपल्या दूचाकीवरून काही कामानिमित्य मलगेवाडी कडे जात होते. मलगेवाडी फाट्यावर ते आले असता अचानक रस्त्याकडेला असलेले आकाशी झाड उन्मळून खाली पडले. या झाडाची एक फांदी त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. दोन बरगड्या मोडून मणक्याला जोराचा मार बसल्याने गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना लोकांच्या निदर्शनाला हि गोष्ट आल्यानंतर तात्काळ त्यांना अडकूर येथे उपचार दाखल केले. पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णांलयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी बस स्टाप आहे. सुदैवाने या वेळी या बस स्टॉपवर कोणतेही मोठे वाहन अथवा प्रवाशी नव्हते. झाड पडल्यानंतर अवघ्या काही सेकंदात या ठिकाणी बस आली. जर हिच बस एक मिनिटापूर्वी येथे आली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मागील आठवड्यात बांधकाम विभागाने अडकूर ते बोंजूर्डी पर्यंतच्या रस्त्याकडील रस्त्यावर झुकलेली झाडे तोडली होती. पण त्या पुढील झाडे तोडली नाहीत. हे पण झाड झुकलेले होते. त्याच वेळी ते पण तोडले असते तर हा अनर्थ घडला नसता अशी प्रवाशी वर्गामध्ये चर्चा होती.
No comments:
Post a Comment