हलकर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षाचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2019

हलकर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षाचे वाटप

हलकर्णी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षाचे वाटप करण्यात आले. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष रोपे वाटप करण्यात आली. हलकर्णी ग्रामपंचायतीने या वर्षी ३२०० (तीन हजार दोनशे) रोप वाटपाचे उदिष्ट पुर्ण करत ६९० कुटुंबाना घरटी ३ (तीन) प्रमाणे वेग वेगळी रोपे देऊन, शासनाच्या  ३३कोटी वृक्ष लागवड या योजनेत सहभाग घेतला.या वर्षी हलकर्णी गावात एकूण ५००० (पाच हजार) नवीन वृक्ष रोपे लावली आहेत. या मध्ये सर्वाधिक काजु ची रोपे आहेत. इतर आंबा, फणस, पेरू, चिंच, शेगल, सीता फळ, आपटा अशी अनेक रोपे वाटप करून ती जगवण्याची विनंती सरपंच एकनाथ कांबळे यांनी ग्रामस्थांना केले आहे. या वेळी सर्व सदस्य, गावातील सर्व नागरिक, व ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतीचे कामगार हजर होते.


No comments:

Post a Comment