प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा - शिक्षकांचे आमदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2019

प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा - शिक्षकांचे आमदारांना निवेदन

प्राथमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करा. या मागणीचे निवेदन आमदार संध्यादेवी कुपेकर यांना देताना शिक्षक.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परीणाम होत असल्याने शिक्षकांना दिली जाणारी बी एल ओ व इतर अशैक्षणिक कामे बंद व्हावीत यासाठी चंदगड प्राथमिक शिक्षक संघ व तालुक्यातील पालकवर्गाच्या वतीने आमदार सध्यांदेवी कुप्पेकर यांना निवेदन देण्यात आले.
चंदगड तालुक्यातील प्रंचड रिक्त पदे व समाणीकरण यामुळे बहुतांश शाळामध्ये शिक्षक सख्यां अपुरी आहे. अपुरा शिक्षक वर्ग व त्यांना करावी लागणारी अशैक्षणिक कामे यामुळे शिक्षक वर्ग त्रस्त झाला आहे. त्यातच बी एल ओ सारखे वर्षभर शिक्षकांना वेठीस धरणारे काम लावल्याने शिक्षक शाळेतच नाहीत. यामुळे शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरत आहे. अनेक शाळांतील विद्यार्थी इग्रंजी माध्यमाकडे जात आहेत. तहसिल कार्यालयाला शाळांची गुणवत्ता, शाळा बंद पडणे या विषयी काहीही देणे घेणे नसुन आपले काम होणे विषयी मतलब आहे. काम नाकारल्यास नोटीस काढणे, गुन्हे दाखल करण्याची भिती घालणे असे प्रकार चालु आहेत.
शाळेत शिक्षक नसल्याने पालकवर्गही आक्रमक झाला असुन त्यांनीही शाळा व्यवस्थापन कमिटीच्या माध्यमातुन आमदारांना ठराव दिले आहेत. मा.आमदार सो यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊण मा.तहसिलदार यांचे सोबत दि. २५ जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला सर्व जि.प. सदस्य व सभापती उपस्थित राहणार आहेत. बी एल ओ कामाचा वाढता व्याप, झेरॉक्स खर्च, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून मिळणारी वागणुक,सुट्टीस मिटींग, महीला शिक्षकांची नेमणुक व हेळसांड, पुन्हा पुन्हा त्याच कागदपत्रांची मागणी, वेळी-अवेळी मिटींग यामुळे शैक्षणिकतेची झालेली दैयनीय अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावेळी रमेश हुद्धार, शिवाजी पाटील, महादेव साबंरेकर, शाहु पाटील, दस्तगीर उस्ताद, सदानंद पाटील, भरमाणा मुरकुटे आदी शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment