![]() |
दयानंद काणेकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले चंदगड अर्बनचे चेअरमन व काजू उद्योजक दयानंद काणेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. काणेकर यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. आगामी विधानसभा व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काणेकर यांचा भाजप प्रवेश महत्वाचा असून राष्ट्रवादीसाठी धक्कादायक ठरला आहे. काणेकर यांचे कार्यकर्ते महेश वणकुंद्रे यांनीही त्यांच्यासोबत प्रवेश केला.
![]() |
दयानंद काणेकर |
चंदगड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे तीन सदस्य असून नंदीनी पाटील, रुपा खांडेकर व दयानंद काणेकर हे तीन सदस्य होते. त्यापैकी काणेकर यांनी भाजप प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादीचे फक्त दोन सदस्य पंचायत समितीमध्ये उरले आहेत. चंदगड नगरपंचायतीच्या आगामी पहिल्या निवडणुकीत भाजप सत्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असून यासाठी एकेक कार्यकर्ता एकत्र केला जात आहे. राज्यभर भाजपमध्ये इतर पक्षातील नेते कार्यकर्त्यांचे इनकमींग सुरु आहे. त्याचीच पुनरावृत्ती चंदगड तालुक्यात झाली आहे.
मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. यावेळी सदस्य दयानंद काणेकर यांच्याशी संपर्क साधला असता चंदगड शहरातील प्रलंबित कामासाठी निधी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भाजप सरकार असून केवळ विकासनिधीसाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी गोपाळराव पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, विशाल पाटील, समीर पिळणकर, संजय पाटील, अशोक जाधव, अंकुश गवस, योगेश कुडतरकर, संदिप देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment