कोल्हापूर ला लवकरच मिळणार विजेवर चालणाऱ्या बसेस....छत्रपती संभाजीराजे - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2019

कोल्हापूर ला लवकरच मिळणार विजेवर चालणाऱ्या बसेस....छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर शहरासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस देण्याचे निवेदन मंत्री महोदयांना देताना संभाजीराजे व इतर.
कोल्हापुर / प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीराजेंनी अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांची संसदेमध्ये भेट घेतली. यावेळी राजेंनी सावंतांच्या निदर्शनास आणून दिले की, कोल्हापूर महानगर पालिकेने 12 जुलै 2019 रोजी केंद्राकडे फेम इंडिया स्कीम फेज 2 मधून बसेस मिळाव्यात म्हणून प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यावर तात्काळ निर्णय करून कोल्हापूर च्या जनतेला न्याय द्यावा. 
अवजड उद्योग मंत्री, अरविंद सावंत यांनी लवकरात लवकर, कोल्हापूर ला विजेवर चालणाऱ्या बसेस ची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूर सारख्या प्रगतिशील शहरात, प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सार्वजनिक वाहतुकीमध्ये विजेवर चालणाऱ्या बसेस आल्या तर प्रदूषणा मध्ये मोठ्याप्रमाणात कपात होऊ शकते.  केंद्रशासनाने देशभरात, येणाऱ्या काळात स्वच्छ उर्जेला प्राथमिकता दिली आहे. पेट्रोल, डिझेल वर चालणारी वाहने येणाऱ्या काळात कमी होतील. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण तर कमी होईलच, त्याचबरोबर भारताचे तेलाबाबत दुसऱ्या देशावर असलेले अवलंबित्व ही कमी होईल. त्यामुळे केंद्र शासनाच्या दूरदृष्टीचे कौतुक केले पाहिजे असे संभाजीराजेंनी सांगितले.

No comments:

Post a Comment