कोवाड महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यी संघटनेच्या अध्यक्षपदी नरसिंग पाटील, उपाध्यक्षपदी संजय पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2019

कोवाड महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यी संघटनेच्या अध्यक्षपदी नरसिंग पाटील, उपाध्यक्षपदी संजय पाटील

नरसिंग पाटील                                    संजय पाटील
तेऊरवाडी / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली . या संघटनेच्या अध्यक्षपदी निट्टूरचे नरसिंग पाटील तर उपाध्यक्षपदी कोवाडचे संजय पाटील यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या नियम व नियमावलीनुसार या संघटनेची स्थापना करण्यात आली असून महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी या संघटनेचा उपयोग होणार आहे. अन्य सदस्य पुढीलप्रमाणे, श्रीकांत पाटील, सचिव (कामेवाडी), बाळकृष्ण गणाचारी (किणी), संतोष शारबिद्रे (मलतवाडी), अविनाश हुद्दार (कुदनुर), संदिप तारिहाळकर (कागणी), विवेक कुमार मणगुतकर (किणी), अजितकुमार पाटील (कालकुंद्री), सौ. अस्मिता पाटील (किटवाड), सौ. सुप्रिया कांबळे (कालुकुंद्री) यांची निवड करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment