चंदगड / प्रतिनिधी
एसटी महामंडळाकडून सवलतीच्या दरातील प्रवासाकरिता ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड वाटप चालू आहे .मात्र या स्मार्ट कार्ड बाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम आवस्था निर्माण झाली असून सोशल मीडिया वरून ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटरचा मोफत प्रवास अशी अफवा असल्याने ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तालुक्याच्या आगार विभागामध्ये गर्दी करत आहेत.मोफत प्रवास अशी अफवा पसरून स्मार्ट कार्ड ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात मारण्याचा उद्योग एसटी महामंडळाने सुरू केला आहे ते रद्द करावे असे मत अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे विशेष कार्यकारी सदस्य प्राध्यापक रामकुमार सावंत यांनी व्यक्त केले आहे.
![]() |
चंदगड येथे एसटी आगारामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी जेष्ठांची लागलेली रांग. |
महाराष्ट्र शासनाने 60 वर्षावरील नागरिकाला ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा दिला व तालुका तालुक्यातून तहसीलदारांमार्फत अशा नागरिकांना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र देण्यात आली. या ओळखपत्राचा वापर 60 वर्षावरील नागरिकांना रेल्वे, विमान ,आरोग्यसेवा, बँका व पतसंस्था वरील ठेवीवरील जादा व्याजदर मिळवण्यासाठी होतो . मात्र एसटी महामंडळ मात्र 60 ऐवजी 65 वर्षावरील नागरिकालाच अर्ध्या तिकिटाचा लाभ मिळवून देत आहे .सध्या एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये संभ्रम अवस्था निर्माण केली आहे .सोशल मीडिया वरून चार हजार किलोमीटरचा प्रवास मोफत असे जाहिरात करून स्मार्टकार्ड ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात मारण्याचा उद्योग सुरू केला आहे .त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शासनाचे अधिकृत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र असतानादेखील स्मार्ट कार्ड काढण्यासाठी उतारवयात एसटी आगार मध्ये तासन तास तिष्ठत उभा रहावे लागत आहे. या स्मार्ट कार्ड योजना मुळे ज्येष्ठ नागरिकांना वर्षभरात केवळ चार हजार किलोमीटर प्रवास हा अर्ध्या तिकीटाने करावे लागणार असून त्यापुढील प्रवास हा फुल तिकीटने करावे लागणार आहे. त्यामुळे एस टी महामंडळ ज्येष्ठ नागरिकांच्या एसटी सवलत वर गदा आणण्याचा उद्योग सुरू केला असून हे स्मार्ट कार्ड रद्द झाले पाहिजेत असे मत अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे विशेष कार्यकारी सदस्य प्राध्यापक रामकुमार सावंत यांनी व्यक्त केले आहे.
शिवाय स्मार्ट कार्ड कडण्याचे कंत्राट खाजगी एजंटांना दिल्याने खाजगी एजंट मनमानी पद्धतीने पैसे उकळत असून याचा त्रास उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना होत आहे .शासनाने 6 मे 2000 च्या जीआर नुसार ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्यासाठी दिलेली सनद ही कायदेशीर असून पुन्हा स्मार्टकार्ड करण्याची गरज नाही . महाराष्ट्रात दीड कोटी ज्येष्ठ नागरिक असून शासन या ज्येष्ठ नागरिकांचे जीवाशी खेळत असल्याची खंत प्राध्यापक रामकुमार सावंत यांनी व्यक्त केली . सध्याच्या स्मार्ट कार्ड हे केवळ एसटीचाच प्रवास चार हजार किलोमीटर अर्ध्या तिकिटाने करण्यापुरताच उपयोगी आहे. हे स्मार्ट कार्ड रेल्वे ,विमान या ठिकाणी चालणार नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास देऊन स्मार्टकार्ड काडण्याची शक्ती करू नये किंबहुना हे स्मार्ट कार्ड रद्द करावे अशी मागणी जोर धरत आहे.
No comments:
Post a Comment