गडहिंग्लजच्या बीएसएनएल आधिकाऱ्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यावर सापडलेले पैसे आणि दागिने केले परत - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2019

गडहिंग्लजच्या बीएसएनएल आधिकाऱ्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यावर सापडलेले पैसे आणि दागिने केले परत

शिवाजी तोरसे
संजय पाटील, तेऊरवाडी
सध्या सर्वत्र गळ्यातील सोनसाखळ्या चोरी , घरफोडी , एटीएम मधील कॅश चोरी अशा घटना घडत असतानाही रस्त्यावर सापडलेले पैसे आणि दागिन्यांचे पाकीट  पत्ता शोधून परत करणाऱ्या गडहिंग्लज येथील बीएसएनएल कार्यालयातीत अधिकारी शिवाजी राजाराम तोरसे यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा चंदगड -  गडहिंग्लज तालूक्यात चालू आहे .
अडकूर (ता. चंदगड) येथील राजेंद्र घोळसे हे आपल्या दूचाकीवरून पत्नीसमवेत रविवार दि .७ जूलै ला गडहिंग्लजला एका रुग्णाला बघण्यासाठी गेले होते . रस्त्यारुन जाताना पाऊस आल्याने छत्री  धरण्याच्या प्रयत्नात नकळत श्री .घोळसे यांच्या पत्नीच्या हातातून ते पाकीट हरवले . हॉस्पिटलला गेल्यानंतर पाकीट हरवल्याचे सौ . घोळसे यांच्या लक्षात आले . त्याना खूप मोठा धक्का बसला . लगेच हॉस्पीटलचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आल . पण पाकीट सापडले नाही . त्यानंतर गडहिंग्लज शहरामध्ये ज्या भागातून ते गेले होते त्या सर्व भागात शोध घेण्यात आला . पण सर्व व्यर्थ ठरले .सहा हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असणारे पाकीट गेल्याचे दुःख करत पति - पत्नी गावी परतले . रात्री नऊ वाजता राजेंद्र याना फोन आला .आपले पैसे आणि दागिने असणारे पाकीट सापडले असून गडहिंग्लजला येऊन घेऊन जा असे सांगून बोलणाऱ्या व्यक्तिने आपले नाव व पत्ता सांगीतला . श्री घोळसे यानी आपली ओळख पटवून ते पाकीट परत घेतले . मूळ गाव बोळावी ता . कागल येथील असणारे शिवाजी तोरसे हे येथील बीएसएनएल कार्यालयात प्रामाणिकपणे सेवा करतात .  हे पाकीट सापडल्यानंतर त्यातील पैसे व दागिणे बघून जराही मन विचलित झाले नाही . या ऊलट ज्यांचे पाकिट हरवले आहे त्यांची अवस्था काय झाली असेल ? या विचाराने ते अस्वस्थ झाले .पाकीटमध्ये असणाऱ्या नावाचा आधार घेऊन फोन नंबर शोधून काढला . अडकूर एक्सेंज मधून फोन जोडून पाकीट सापडल्याचे सांगीतले. अशा रीतीने रस्त्यात सापडलेले पाकीट त्यानी प्रामाणिकपणे परत तर केलेच पण या मोबदल्यात साधा चहाचा कप सुद्धा घेण्यास नकार दिला . शिवाजी तोरसे यांच्या या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा होत आहे.



1 comment:

Unknown said...

Congratulations dagi

Post a Comment