कालकुंद्री / प्रतिनिधी
किल्ले पन्हाळगडाला सिद्दी जौहरने घातलेल्या वेढ्यातून छत्रपती शिवरायांना सहीसलामत बाहेर काढण्यासाठी प्रति शिवाजी बनून सिद्धीच्या भेटीला जाऊन स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या नाभिक समाजाचे रत्न स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांच्या ३५९ व्या बलिदान दिनानिमित्त शनिवार 13 जुलै 2019 रोजी चंदगड शहर व तालुक्यातील सर्व सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय नाभिक समाज सुधारणा मंडळ चंदगडच्या वतीने घेण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी या दिवशी सर्व व्यवसाय बंद ठेवून पन्हाळगड येथे संपन्न होणाऱ्या बलिदान दिन कार्यक्रमाला उपस्थित रहावे. नाभिक समाजातील नररत्नाच्या स्मृतींना अभिवादन करावे .असे आवाहन महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बामणे, पदाधिकारी अनिल शेवनगेकर, हनुमंत जाधव, सुनील वाडकर, अशोक शिवनगेकर, वैजू शिवनगेकर, विशाल सपकाळ आदींसह संत सेना महाराज नाभिक समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment