पाटणे माध्यमिक विद्यालयाला निर्भया पथकाची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2019

पाटणे माध्यमिक विद्यालयाला निर्भया पथकाची भेट

पाटणे (ता. चंदगड) येथील हायस्कुलमध्ये मार्गदर्शन करताना निर्भया पथकातील महिला पोलिस निरीक्षक बी. ए. चौगुले व इतर.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
पाटणे (ता. चंदगड) येथील श्री छत्रपती शहाजी हायस्कूल येथे आज निर्भया पथकाने भेट दिली. यावेळी  8 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनीना निर्भया पथकातील सदस्यानी  मार्गदर्शन केले. पथकाची ओळख   बी. एस .चिगरे यानी करून दिली. या पथकामध्ये  गडहिंग्लज विभागाचे सहायक फौजदार श्री. खंडाळे, महिला पोलिस निरिक्षक बी .ए. चौगुले यांनी मुलीना स्वतःचे रक्षण कसे करायचे, न घाबरता प्रसंगाला सामोरे कसे जायचे याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर मुख्याध्यापक  एन .जे. लांडे यानीही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.    कार्यक्रमाचे आभार आर. व्ही .मोहीते यानी मानले. 



No comments:

Post a Comment