कोल्हापूर शेणगावच्या युवराज येडूरे यांची मनसे राज्य उपाध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2019

कोल्हापूर शेणगावच्या युवराज येडूरे यांची मनसे राज्य उपाध्यक्षपदी निवड

युवराज रामचंद्र येडूरे
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
सामाजिक कामात सतत अग्रेसर तसेच सर्वसामान्य लोकांच्या मदतीला सदैव तत्पर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेणगाव गावचे सुपुत्र युवराज रामचंद्र येडूरे यांची मनसे राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली. सदर  निवडीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी प्रदान करण्यात आले. यावेळी जनहित कक्षाचे राज्याध्यक्ष किशोर शिंदे, राज्य सचिव दीपक कदम, मंगेश कोरे, संदीप बोटे, उदय कांबळे यांसह महाराष्ट्रातील अन्य पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निवड ही युवराज येडुरे यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र एन. जी. ओ. समिती राज्याध्यक्ष या पदावर कार्यरत असताना केलेल्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही मोठी जबाबदारी दिली आहे.

No comments:

Post a Comment