चंदगड तालुक्यातील 25 पूरग्रस्तांना स्वामी प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने घरे देणार - शिवाजीराव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2019

चंदगड तालुक्यातील 25 पूरग्रस्तांना स्वामी प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने घरे देणार - शिवाजीराव पाटील

शिवाजीराव पाटील
चेतन शेरेगार / चंदगड - प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या  पुराने तालूक्यातील  शेती व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील  अत्यंत गरीब कुटुंबातील लोकांची  घरे पडल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.उद्ध्वस्त झालेल्या तालुक्यातील 25 गरीब कूटूबांना  मुंबई येथील श्री स्वामी प्रतिष्ठान व भाजप यांच्यावतीने घरे बांधून देणार असे प्रतिपादन स्वामी प्रतिष्ठान व भारतीय जनता पक्ष माथाडी कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. 
चंदगड तालुक्यातील पुरग्रस्थांची चौकशी आणि मदतीसाठी पाटील चंदगड विधानसभा मतदारसंघात आले आहेत त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, `आपल्या मतदार संघातील पुरग्रस्थांची झालेली हानी खुपच मोठी आहे. सामाजिक भावनेने समाजातील प्रत्येक व्यक्ती या परस्थितीत एकमेकांना सहकार्य करण्याच्या हेतूने प्रयत्न करत आहे ही खुपच चांगली बाब आहे. आपल्यावर  समाजाचे खुप मोठे ऋण आहेत आणि आशा हे ऋण फेडता येते नाहीत. सामाजिक भावनेतून आपल्या बांधवांना सावरण्यासाठी आपणच मदत करावी लागणार आहे. शासन आणि विविध सामाजिक संस्था आपल्या  स्तरावर नुकसानग्रस्त कूटूबांना मदत  करत आहे.या पूरामुळे  उद्ध्वस्त झालेल्या 25 गरीब कूटूबांना घरे बांधून देऊन त्याचे संसार उभे करण्याचे काम श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व भाजपच्या संयुक्त विद्यमाने करणार असल्याचे  शिवाजी पाटील यांनी सांगितले. यावेळी  संगयोचे अध्यक्ष सूनिल काणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, सुनिल पाटील, श्रीशैल नागराळ आदी उपस्थित होते. 
चेतन शेरेगार, चंदगड

No comments:

Post a Comment