![]() |
नागवे (ता. चंदगड) नावळेवाडी जंगलातील काही भागाचे भुख्खलन होवून शेतीचे नुकसान झाले आहे. |
चंदगड तालुक्यातील नागवे गावातील नावळेवाडी येथून दीड कि. मी अंतरावर असलेल्या जंगलातील काही गाभाचे भुस्खलन झाल्यामुळें शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लोकांत चिंता व्यक्त केली जात आहे.
चंदगड तालुक्यातील नागवे हे गाव जंगलाच्या पायथ्याशी आहे. या गावातील नावळेवाडी येथील दक्षिण भागाकडे असलेल्या जंगलातील सुमारे तीन-चार एकर भुभाग खचला आहे. गेल्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या धुवाँदार पावसामुळे नागवे येथील नावळेवाडी जवळच्या जंगलात हत्ती गावाकडे येवू नये. यासाठी वन विभागाच्या वतीने चर खोदला आहे.
प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे चरात पाणी साचून राहिले. जमीन ठिसुळ झाल्याने चराजवळून जमिनीचे मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाल्याने जंगलाजवळील सुमारे एक एकरावर पिकांचे नुकसान झाले आहे. भात, नाचना, उस, काजु आदि पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना भरपाईसाठी लागणारी कागदपत्रे जमा करताना होणारा त्रास आणि दीली जाणारी मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा आहे. मागील वर्षी केलेल्या पंचनाम्यातील लोकांना अजूनही काही मिळाले नसल्याचे नागरीकांनी सांगितले.
No comments:
Post a Comment