मराठी अध्यापक संघाच्या वतीने दाटे येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2019

मराठी अध्यापक संघाच्या वतीने दाटे येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने दाटे (ता. चंदगड) येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
नागनवाडी / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ (कोजीम) यांच्यावतीने चंदगड तालुक्यातील दाटे येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मागील आठवड्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यातील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. या पुरग्रस्तांना अनेक प्रकारची मदत अनेक सामाजिक संघटना करत आहेत. पण या महापुरामुळे अनेक शालेय विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. याची दाहकता लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांनी निधी उभारून शैक्षणिक साहित्य जमा केले. चंदगड तालुक्यातील पुरामुळे सर्वात जास्त नुकसान झालेल्या दाटे या गावातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, रंगपेटी इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गोंधळी, राजेंद्र पाटील, मदन निकम, पी. डी. पाटील, अरुण कुंभार, चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव शिवणगेकर, संजय साबळे, हणमंत पाऊसकर, रवी पाटील, बी. एम. पाटील, जी. एन. धुमाळे, पी. एस. मगदूम आदी शिक्षकासह सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.               (वृत्तसंकलन - प्रशांत मगदूम, नागनवाडी)


No comments:

Post a Comment