सोनारवाडी येथील जयवंत नाईक यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2019

सोनारवाडी येथील जयवंत नाईक यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

जयवंत नाईक
चंदगड / प्रतिनिधी
सोनारवाडी (ता. चंदगड) येथील जयवंत मारुती नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. श्री. नाईक यांनी आज पर्यंत भटक्या-विमुक्तांच्या अडीअडचणी सोडविम्यासाठी चांगले काम केले आहेत. याची दखल व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या शिफारशीवरून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे. देशाचे नेते पद्मभूषण शरदचंद्रजी पवार, आमदार जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार अजितदादा पवार, आमदार हसन मुश्रीफ, हिरालाल राठोड यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष मजबुतीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अधीन राहून काम करावे. पक्षाचा अधिक विस्तार करून अनेक पदाधिकारी पक्षाची जोडावे ही जबाबदारी श्री. नाईक यांच्यावर देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment