![]() |
अथर्व इंटरट्रेडकडून चंदगड तालुक्यातील पुरग्रस्तांना मदत देताना कंपनीचे मानसिंग खोराटे व इतर. |
चंदगड तालुक्यातील अतिवृष्टी व महापुरात नुकसान झालेल्या पुरग्रस्त नागरीकांना अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. संचलित दौलत सहकारी साखर कारखाणा हलकर्णी यांच्या वतीने वस्तु स्वरुपात मदत देण्यात आली.
चंदगड तालुक्यातील धुमडेवाडी, घुल्लेवाडी, निठुर, कोवाड या गावातील पुरग्रस्त लोकानां मदत देण्यात आली यावेळी कंपनीचे सीईओ मानसिंग खोराटे याच्या हस्ते पुरग्रस्तांना साहीत्य वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. येणाऱ्या चार दिवसामध्ये पुरग्रस्त भागात त्यांना गरज असणाऱ्या वस्तु पोहचवणार त्याचबरोबर शेतातील ऊस पिक नुकसाणी बाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणार असल्याचे मानसिंग खोराटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment