चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला होता. 3 ते 14 ऑगस्ट 2019 या दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वीज पुरवठा व इंटरनेट सुविधा बंद असल्याने नामनिर्देशन पत्र भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे चंदगड शहरातील सर्वपक्षीय सदस्यांनी चंदगड नगरपंचायत निवडणुक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. 14 आगस्ट 2019 या अखेरच्या तारखेपर्यंत कोणाचेही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. आज चंदगडमधील पुरपरिस्थिती लक्षात घेता निवडणुक आयोगाने चंदगड नगरपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम अधिकृतपणे रद्द केला.
राज्य निवडणूक आयोगाकडून 30 जुलै 2019 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित चंदगड नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र वेबसाईटवर भरण्याकरिता 3 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2019 हा कालावधी होता. मात्र या दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूर येवून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थिती यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे नामनिर्देशन पत्र सादर करण्याची प्रक्रिया यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याची बाब जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बदललेल्या आपत्कालीन परिस्थिती व बचाव कार्याची आवश्यकता विचारात घेता, येथील परिस्थिती सुरळीत होण्यास काही कालावधी लागणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्माण निर्मित धनगर नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करून येथील निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती आयोगाला केली होती.
चंदगड तालुका व शहरांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती
निर्माण झालेली होती. वीज पुरवठा व इंटरनेट सुविधा खंडित झाला होता. शहरात
सातत्याने पावसाची संततधार सुरू राहिल्याने शहराचे सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते.
धरणातील निसर्गामुळे शहर व तालुक्यातील नद्यांना ओढ्यांना पूर येऊन चंदगड
तालुक्याची संपर्क तुटला होता. रस्ते पाण्याखाली गेल्याने चंदगड शहरातील
नागरिकांना दळणवळण करणे शक्य झाले नव्हते. त्यावेळी वीजपुरवठा व इंटरनेट सेवा बंद
असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नामनिर्देशन पत्र भरणे शक्य होत नव्हते. यापूर्वी
ज्यांनी नामनिर्देशनपत्र ऑनलाइन भरली आहेत. त्यांना अतिवृष्टीमुळे निवडणूक निर्णय
अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी पोहोचणे शक्य होत नव्हते.
चंदगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 3 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे एक ही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही. ही
परिस्थिती लक्षात घेता भारतीय संविधान, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व
औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 10 अ (4) मधील तरतुदी घ्यानी घेता नवनिर्मित चंदगड
नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे
निवडणुक आयोगाचे जाहीर केले आहे.
No comments:
Post a Comment