बेळगाव येथील शिवप्रतिष्ठान हिदुस्थान व एफ. एम. सी. जी.डिस्टिब्यूटर्स बेळगाव-बेंगलोर यांच्या वतीने कोवाड परिसरातील पुरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
चंदगड तालूक्यातील कोवाड तसेच परीसरातील गावात ताम्रपर्णी तथा घटप्रभा नदीच्या पुरामुळे बाधित कुटुंबियांना गुरुवारी दि.१५ आँगस्ट रोजी एफ. एम. सी. जी.डिस्टिब्यूटर्स बेळगाव-बेंगलोर तसेच श्री शिव प्रतिष्ठान,हिंदूस्थान बेळगाव विभागामार्फत जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम यांचेकडून कार्यकर्ते अभीजीत अष्टेकर, शांतीनाथ बोंगार्डे,परशुराम कोकीतकर, अजित पाटील,अनिल केसरकर आदींनी पूरपरिस्थिती चा आढावा घेऊन शहरातील सर्व फार्मसी ना सँनिटरी पँड ,रोगप्रतिकारक साहित्य देण्यात आले. ताम्रपर्णी तसेच घटप्रभा काठावरील हानीग्रस्त लमाण वाडा ता.गडहिंग्लज ,मर्णहोळ ता.बेळगाव, चंदगड तालूक्यातील कामेवाडी, राजगोळी खुर्द,दुंडगे,कोवाड, निट्टूर, .आदी गावात जीवनोपयोगी वस्तू तसेच अन्नधान्य ,स्वच्छता सुविधा पुरविण्यात आली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे उचगाव विभाग प्रमुख मिथिल जाधव, नरेश जाधव,सुरज हणमशेट ,प्रफुल्ल शिरवळकर , नितीन कुलकर्णी,यांसह किरण बडवाण्णाचे,गजानन पाटील, गजानन बाडीवाले,विजय बाडीवाले, पद्मप्रसाद हूली,विजय चव्हाण,प्रविण कुंदप,प्रज्ज्वल कुंदप,प्रणव आडके,शुभम हुली,नेहाल जाधव,अमर जाधव ,अक्षय कोळी,पारीतोष हुक्केरीकर,नागाप्पा कुरबर,उत्तम नेसरकर ,,कीर्ती अरूण पाटील,पुंडलिक भांबर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अत्यंत दुर्गम लमाण वाडा तसेच मर्णहोळ या दोन ठिकाणी घटप्रभा नदी पलीकडील शट्टीहळ्ळी ता.हुक्केरी येथील दुर्गवीर प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यां कु.मयूरी पाटील तसेच वर्षा पाटील चार पाच कि.मी.चा खडतर प्रवास करून वाटपात सहभागी होण्यासाठी आल्याबद्दल उपस्थितीतांकडून त्यांचे कौतुक होत होते.
No comments:
Post a Comment