अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हयातील शाळा, महाविद्यालयांना 5 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहिर - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2019

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हयातील शाळा, महाविद्यालयांना 5 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहिर


कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांच्या वतीने अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हयातील शाळा, महाविद्यालये यांना 5 ऑगस्ट 2019 रोजी  सुट्टी  जाहिर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर  तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांनी प्रसिध्दिला दिले आहे. 
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडील पूर्वसूचनेनुसार  कोल्हापूर जिल्हयातील झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता सदर अतिवृष्टीमुळे जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विदयार्थी यांच्यावर होऊ
नये याकरिता कोल्हापुर  जिल्हयातील सर्व शाळानां व महाविद्यालये सोमवार दि.5 ऑगस्ट,2019 रोजी सुट्टी घोषित करणेत येत आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जिल्हाधिकारी, कोल्हापूर  तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांनी प्रसिध्दिला दिले आहे. 

No comments:

Post a Comment