कै. नरसिंगराव पाटील कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा
![]() |
शिनोळी येथे नरसिंगराव पाटील गटाच्या प्रमूख कार्यकर्त्यांची बैठकीत बोलतांना राजेश पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
कै. आमदार नरसिंगराव पाटील गट हा चंदगड तालूक्यातील प्रबळ गट आहे. या गटाने गेल्या अनेक वर्षापासून जनतेची अखंड सेवा केली आहे. यापुढेही सर्वसामान्य जनतेची सेवा करता यावी यासाठी जिवाभावाचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे आता ठरलं आहे. पक्षाने उमेदवार दिल्यास पक्षातून अन्यथा स्वबळावर अपक्ष आमदारकी लढविणार असल्याचे गोकुळचे संचालक व तालुका संघाचे चेअरमन राजेश नरसिंगराव पाटील यांनी आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जाहिर केले. शिनोळी (ता. चंदगड) येथे कै. नरसिंगराव पाटील गटाच्या कार्यकर्ता मेळावा आज घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला तालुक्यात पुर परिस्थिती गंभीर असतानाही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
मेळाव्याला उपस्थित कार्यकर्ते. |
प्रारंभी कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक केली. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत यावेळी विधानसभा निवडणुक लढविण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी राजेश पाटील पुढे म्हणाले, ``नरसिंगराव पाटील गट मतदार संघाच्या विकासासाठी कठीबद्ध आहे. अनेक वर्षे संघर्ष करत विजय - पराजय न मानता समाजकार्य चालू आहे. दौलत शेतकऱ्यांच्या मालकीचा रहावा, यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत. दौलत चालू करणाऱ्या कोणत्याही कंपनीला आमचा विरोध नाही तर केडीसीसीच्या चुकीच्या कराराला विरोध आहे. खासदारकीच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना मदत केली, ती केवळ माझे मेहुणे म्हणून नाही तर स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी चंदगडसाठी केलेल्या कामाची परतफेड म्हणून मदत केली. तरूण पिढीच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसीमध्ये मोठे उदयोग येणे गरजेचे आहे. या वर्गाच्या आशा आकांक्षा पुर्ण करण्याबरोबरच दौलत शेतकऱ्यांचा करण्यासाठी निवडणूक लढणेचे गरजेचे असून एखादा पक्ष नाहितर स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. कार्यकर्त्यांचीही हिच भावना असून आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे सांगितले. भिकू गावडे (नागनवाडी), सरपंच सुनिल पवार (यशवंतनगर), गजानन कुंभार (माणगाव), सुरेश पाटील (हाजगोळी), तात्यासाहेब शिरोलीकर (शिरोली), सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे (सातवणे), पी. बी. कोकीतकर (कुदनूर), शिवानंद हुंबूरवाडी, माजी पं. स. सदस्य अनिल सुरुतकर (माणगाव), श्री. कुरणे (तळगुळी), दिग्वीजय देसाई (कागणी) आदि कार्यकर्त्यानी राजेश पाटील यानी निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते हवा तो त्याग करायला तयार असल्याचे मनोगतातून सांगीतले. तर या मेळाव्यात कालकुंद्री येथील ग्रामस्थांनी 21 हजारांचा निधी निवडणूकीसाठी राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या मेळाव्याला तालुका संघाचे संचालक अभय देसाई, तानाजी गडकरी, माजी सरपंच प्रकाश पाटील, सुर्यकांत पाटील, माजी संचालक दत्तात्रय पाटील, पोमाणी पाटील, बाळू चौगुले यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment