![]() |
पाटणे येथील नदीवर आलेल्या पुरात टेम्पो ट्रॅव्हलर गाडी बुडता बुडता येथील तरुणांनी बाहेर काढली. |
कार्वे / प्रतिनिधी
पाटणे येथील नदीच्या पुरात टेम्पो ट्रॅव्हलर गाडी बुडता बुडता येथील तरुणांनी बाहेर काढली. तरुणांच्या प्रसंगावधानाने बारा जणांचे प्राण वाचले. ही घटना पाटणे येथे सोमवारी दुपारी घडली.
वडगाव (बेळगाव) येथून तिलारी, पारगड परिसर पाहण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी बारा पर्यटकांना घेऊन पारगड कडे जात होती. येथे चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटणे येथील नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी रस्त्यावर पसरले होते. पाण्याला वेग ही फार आहे. ्या पाण्यातून समोरून जाणार्या टाटासुमो गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न या ट्रॅव्हलरच्या चालकाने केला. रस्त्याच्या उजव्या बाजूला मोठा खड्डा व खड्ड्याच्या पुढे पुराचे भरपूर पाणी होते. या खड्ड्यांचा अंदाज नसतानाही बेजबाबदारपणे चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. येथे उपस्थित असलेल्या तरुणांनी आरडाओरडा केल्यामुळे ट्रॅव्हलर खड्ड्यात जाता जाता वाचली.
![]() |
पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणारे हेच ते पाटणेचे जांबाज युवक. |
मात्र समोरची बाजू खोल पाण्यात गेल्यामुळे येथे पूर पाहण्यासाठी गेलेल्या मनोज विठोबा तुपारे, भैरवनाथ गावडे (जेलुगडे), प्रशांत पोपकर (कळसगादे), शुभम बांदेकर, शिवाजी गावडे, ऋतुराज शिंदे, भावकु जाधव यासह युवक गेले होते. या युवकानी पाण्यात वाहून जाणारी गाडी ओढून धरली. त्याच अवस्थेत मोठी दोरी आणून गाडी झाडाला बांधून ठेवली. व आतील प्रवाशांना खाली उतरविले. पाटणे येथील सुनील घुले यांचे ट्रॅक्टर आणून त्या ट्रॅक्टरने ट्रॅव्हलर गाडी ओढून पाण्यातून बाहेर काढली. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या बारा प्रवाशांचे प्राण वाचले. पाटणे येथील नदीच्या पुढच्या बाजूस दरवर्षी पावसाळ्यात पाणी येते. या पाण्याला वेगही प्रचंड असतो. येथे एक मोठा खड्डा आहे. कित्येक वेळा या ठिकाणी किरकोळ अपघात झाले आहेत. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची उंची वाढवून येथे लहान मोरीचे बांधकाम करावे. अशी मागणी या निमित्ताने येथील नागरिकांनी केली आहे.
1 comment:
Nako tithe shanpan kel ki asach honar....
Post a Comment