![]() |
कोवाड महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लब उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रा.दिपक पाटील, सोबत प्रभारी प्राचार्य एस एम पाटील व मान्यवर |
कालकुंद्री / प्रतिनिधी
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील लोकशाही टिकवून ती बळकट करण्यासाठी सजग नागरिक व मतदारांची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन कोवाड महाविद्यालयाचे प्रा. दीपक पाटील यांनी केले. ते कोवाड महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये राजकीय जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'निवडणूक साक्षरता क्लब' स्थापना कार्यक्रमात प्रमुख वक्ते व समन्वयक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील होते.
.स्वागत आर. टी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. व्ही. आर. पाटील यांनी केले. क्लब चे उद्घाटन संचालक गुंडू सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी पुढे बोलताना प्रा पाटील म्हणाले क्लबच्या माध्यमातून युवकांसाठी राजकारणातील संधी आणि राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करण्याचे मार्गदर्शन या क्लबच्या माध्यमातून होणार आहे. यावेळी प्राध्यापक आर टी पाटील यांनी महाविद्यालयातील निवडणुकांचे स्वरूप स्पष्ट करताना विद्यापीठ कायद्याबाबत विवेचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम पाटील यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी निवडणुकांत सहभाग घेतल्यास त्यातून नवे नेतृत्व उदयास येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी संस्था संचालक आप्पा वांद्रे. बी के पाटील. प्रा.व्ही.एस.पाटील, प्रा.एस.एन. कांबळे,प्रा.ए.एस.आरबोळे आदींसह विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा आर डी कांबळे यांनी केले. तर आभार प्रा व्ही के दळवी यांनी मानले.
1 comment:
Nice news
Post a Comment