 |
कोवाड (ता. चंदगड) येथे पुरात दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. |
संजय पाटील / कोवाड प्रतिनिधी
भिंत खचली,चूल विझली,होते नव्हते ते नेले, प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोड़े ठेवले,मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठी वरती हात ठेऊनी,फक्त लढ़ म्हणा....फक्त लढ़ म्हणा कवी कुसुमाग्रजांच्या याच ओळी आता सत्यात उतरविनाची वेळ आज कोवाड करावर आली आहे. संपूर्ण जिल्यासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टि मुळे आणि धरणा च्या विसर्गामुळे गेले 10 दिवस संपूर्ण चंदगड तालुका जलमय झाला आहे.काही ठिकाणी चा पुर कमी झाला आहे तर काही ठीकाणी ओसरु लागला आहे.अश्याच एका पुर ओसरत असलेल्या नाव, जिद्द अणि वैभव संपन्न असलेल्या बाजार पेठेची ही कहाणी ...ती म्हणजे कोवाड ता.चंदगड ची बाजार पेठ.
 |
दुकानामध्ये पुराच्या पाण्यासोबत चिखल साचला होता. |
संपूर्ण तालुक्याला नव्हे तर जिल्हाला हेवा वाटेल अशी ही बाजार पेठ गेल्या 6 ते 7 दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली होती काल पासून पावसाने उसंत दिल्यामुळे पुराच्या पाण्याखाली संपूर्ण चिखलात रुतलेल्या बाजार पेठ चा भाग काल पासून आपल डोक वर काढु पाहात आहे.कोनाच घर पड़ल,कोनाच छप्पर फाटल,कुणाचा आधार हिरावला अश्या अनेक वेळ प्रसंगी उपयोगी पडणाऱ्या या बाजार पेठेतील व्यापाऱ्यावर आज आसमानी संकटा मुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आ वासुन उभा राहिला आहे.मोठ्या जिकिरिंन अणि चिकाटिने उभे केलेल्या व्यवसाय आज महा पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीति,अणि परिस्थिति निर्माण झाली आहे.
 |
पुरामुळे दुकानांचे झालेले नुकसान. |
ग्राहकाला चांगली सेवा पुरविता यावी यासाठी मोठ्या हौशेने वेळ प्रसंगी कर्ज काढून घेतलेल्या साहित्यावर संपूर्ण पुराने पाण्याचा वरवंटा फिरविला आहे.वाढत गेलेल्या पावसा मुळे येथील बऱ्याच जनाना दुकानातील साहित्य सुध्या कढायला वेळ न मिळाल्याने गेले 6 ते 7 दिवस संपूर्ण दुकाने ही पान्याखाली असल्याने दुकानातील अडकुन पडलेले साहित्य,तयार केलेल फर्नीचर,आणलेल्या मशीनरी,अणि केलेले सुशोभीकरण या सर्व गोष्टिवर पाणी फिरताना प्रत्यक्ष पाहुन त्यांच्या डोळ्या च्या कड़ा ह्या ओल्याचिम्ब होत आहेत. अणि मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे...येतील का ते दिवस अणि येईल का तेच वैभव परत अणि खरच या चिखलातून उभारतील का त्यांचे व्यवसाय,येईल का पूर्वीचे बळ त्यांच्या पंखात ,घेतील का भरारी अणि येईल का त्यांच्या अंगी धाडस..... असे एक ना अनेक प्रश्न हे आज उपस्थित झाले आहेत.एकमेकांना सोबत घेत आता ते काढतील का या सर्व कठिन प्रसंगातून मार्ग,त्याना मी भेटलो असता ते म्हणतात,आता फक्त एकच करायचं अणि ते म्हणजे समोरच्याच्या डोळ्यातल पाणी आपल्या डोळ्यात घ्यायच..... अणि खरच येथील व्यापारी वर्ग हा एकमेकांना सावर ताना आज पहावयास मिळत आहे,आजवर लोकांच्या प्रत्येक अडचणी मध्ये हात पुढे करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दिशेने येतील का मदतीचे हात हा गहण प्रश्न उपस्थित होत आहे.

 |
संजय पाटील, कोवाड |
No comments:
Post a Comment