पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार - खासदार संभाजीराजे - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2019

पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार - खासदार संभाजीराजे

पूरग्रस्तासाठी पाच कोटीचा निधी, चंदगड तालुक्यात पहाणी दौरा

कोवाड (ता. चंदगड) येथे पुर ओसरल्यानंतर परिस्थितीची पाहणी करताना खासदार संभाजीराजे.
चंदगड / प्रतिनिधी
अतिवृष्टीने निर्माण झालेल्या महापुरात अडकुन सर्वस्व गमावलेल्या धुमडेवाडी, निट्टूर, कोवाड, दुडंगे, कुदनुर, राजगोळी, कोनेवाडी, चंदगड येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची काल खास. संभाजीराजे यांनी भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. यावेळी पुरग्रस्तासाठी पाच कोटींचा निधी जाहीर केला. काल निट्टूर येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सवांद साधताना खास. संभाजीराजे म्हणाले, " अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान हे न भरुन येण्यासारखे आहे. शासनाने जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संसार उभ करण्यास पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे घर पडलेल्या शेतकऱ्यांचा समावेश इंदिरा आवास योजनेमध्ये करुन त्यांना या योजणनेतुन मिळणारी रक्कम व शासणाकडून मिळणारी रक्कम असा दुहेरी फायदा मिळावा. यासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी याच्यांशी पत्रव्यवहार केला आहे. पुरामुळे या शेतकऱ्यांची झालेली हानी व शासनाकडुन मिळणारी मदत यात मोठी तफावत आहे. त्यामुळे पुर ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खास पॅकेज मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी कोवाड येथील शेतकऱ्याची जामिनदोस्त झालेली घरे व उघडे पडलेले संसार पाहुन राजे भावूक झाले. कोवाड बाजारपेठेतील दुकानाची नासधुस, मालाची झालेले नुकसान यांचे पचनामे करण्याच्या सूचना शासकिय अधिकाऱ्यांना दिल्या . यावेळी भाजपचे गोपाळराव पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, गोकुळ सचांलक राजेश पाटील, योगेश केदार,जि.प. सदस्य आरुण सुतार, कल्लाप्पा भोगण, सरपंच अमोल सुतार, उपसरपंच सचिन पाटील, सरपंच राजु पाटील ( दुडंगे), चंद्रकात कांबळे, नामदेव सुतार, सरपंच ज्ञानेश्वर गावडे (कोनेवाडी ) तानाजी गडकरी, संजय पवार, नंदकुमार्र ढेरे,प्रविण पवार , प्रविण वांटगी, शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment