खासदार संजय मंडलिक यांच्याकडून पुरग्रस्त गावांना भेटी - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2019

खासदार संजय मंडलिक यांच्याकडून पुरग्रस्त गावांना भेटी

चंदगड पुरपरिस्थितीची पाहणी करताना खासदार प्रा. संजय मंडलिक, राजेश पाटील, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर आदी.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील अनेक गावे महापूराच्या तडाख्यात सापडल्याने मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे,वहानांचे  तसेच  शंभरापेक्षा अधिक घरांची पडझड होवून दोन चार कोटीवर  नुकसान झाले आहे. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी ग्रामस्थांनी पाहण्यासाठी आलेल्या खा.संजय मंडलिक यांना दिली.
गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापुर,गजरगाव,तर चंदगड तालुक्यातील कोवाड, दुंडगे,राजगोळी,कुदनुर,निटूर,म्हा ळेवाडी,दाटे,अडकुर या गावांना  खा. मंडलिक यांनी भेट देऊन तेथील अड़ी-अडचणी समजाऊन घेऊन प्रशासकीय आधिकारी यांना सूचना दिल्या. सोबत  संग्रामसिंह कुपेकर,प्रभाकर खांडेकर,राजेश पाटील,अँड. सुरेश कुराडे,प्रताप कोंडेकर,शेखर मंडलिक,आण्णासाहेब चौगले,अभय अडकुरकर,अशोक मनवाड़कर,राजू रेडेकर,तानाजी गडकरी* यांच्या सह प्रमुख या दौर्यात सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment