चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीसाठी होवू घातलेल्या निवडणूकीचा कार्यक्रम सद्यस्थितीत घेण्यात येवू नये. अशी चंदगड शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने आज तहसिलदार विनोद रणावरे यांची भेट घेवून मागणी केली. यापूर्वी शहरवासीयांनी याबाबतचे निवेदन तहसिलदारांना दिले आहे.
सद्यस्थितीत तालुक्यातील जनता महापूराच्या धक्यातून सावरली नाही. दुकाने, घरे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील व स्थानिक सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच मतदार हे पुरग्रस्तांना आपपल्या परीने मदत करत आहे. नातेवाईकही पुरग्रस असून त्यांना सावरण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे शहरवासीयांची सद्या निवडणुकीची मानसिकता नाही. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी सर्व राजकीय पक्षांच्या वतीने तहसीलदार श्री. रणावरे यांना केली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार नाहीत. याची खबरदारी घेतली जाईल अशी चर्चा शहरातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांतून आहे. बुधवारी (ता. 13) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे कोणीही अर्ज दाखल करु नये, असे आवाहन पक्षप्रमुखांनी शहरवायीयांना केले आहे.
No comments:
Post a Comment