गोकुळ दुध संघाच्या वतीने पुरग्रस्त भागात पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. |
कोल्हापूर / प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूराने थैमान घातले असून, गावातील लोकांना जनावरांसह स्थलांतरीत करणेत आलेले आहे. स्थलांतरीत केलेल्या जनावरांसाठी गोकुळ संघामार्फत पशुखाद्याचे वाटप केले जात आहे. टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील गुरुदत्त शुगर साखर कारखाना येथे सामाजिक बांधिलकी मधून पंचक्रोशीतीलराजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकीवाट, दानवाड इ. गावांमधील सुमारे ६०० ते ७०० जनावरे कारखान्याच्या आवारात व गोडाऊनमध्ये स्थलांतरीत केलेली आहेत. या ठिकाणी गोकुळ संघाने २४० पोती पशुखाद्य १५० पोती टी.एम.आर.ब्लॉक (चाराविट) व सिल्वर पॅलेट १३५ बॅग संघाचे चेअरमन रविंद्र आपटे, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास पाटील, गोकुळचे संचालक बाबा देसाई, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. यु. व्ही. मोगले यांचे उपस्थितीत वाटप करणेत आले.
आंबेवाडी व चिखली येथे पूरामुळे अडकुन पडलेल्या नागरीकांना दुध जनावरांकरीता बोटींमधून पशुखाद्य पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील रांगोळी, चिंचवाड, उलपेमळा, क. बावडा इत्यादी पूरग्रस्त जनावरांकरीताही पशुखाद्याचे वाटप करणेत आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये संघाच्या टँकरद्वारे पाणी पुरवठाही करणेत येत असून संघाच्या ताराबाई पार्क येथील शॉपीमध्ये चोवीस तास गोकुळ दुध विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले जात आहे. जिल्ह्यातील जनावरांच्या औषध उपचारांकरीता संघाच्या सात डॉक्टरांचे पथक तयार केले असून ती सेवा चोवीस तास चालु असून महापूरानंतर जनावरांना रोगराई होवू नये यासाठीही पूरग्रस्त भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण व इतर सर्वती खबरदारी युध्दपातळीवर घेणेत येत आहे. यावेळी गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास पाटील, गोकुळचे संचालक बाबा देसाई, डॉ. यु. व्ही. मोगले, डॉ. व्ही. डी. पाटील, गुरुदत्त शुगरचे संचालक राहूल घाटगे, गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment