`माणसं जोडणाऱ्या माणसांनी`च संकटकाळीही जोडून ठेवली माणसं, जपली सामाजिक बांधिलकी - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2019

`माणसं जोडणाऱ्या माणसांनी`च संकटकाळीही जोडून ठेवली माणसं, जपली सामाजिक बांधिलकी


संपत पाटील, चंदगड
           कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात पुराने थैमान घातले होते. लोक भितीच्या छायेखाली होते. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठाही खंडीत झाला होता. खेड्या-पाड्यात यापेक्षाही वाईट अवस्था होती. कोणाचाही संपर्क होत नव्हता. त्यामुळे कामानिमित्त बाहेरगावी असलेले गावातील लोक चिंतेत होते. विद्युत पुरवठा खंडीत असल्याने मोबाईल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे कोणाचाही संपर्क होत नव्हता. गावाकडे काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी अनेक लोक गावातील लोकांना मोबाईलवर संपर्क करत होते. मात्र मोबाईल सेवाही ठप्प असल्याने संपर्क होत नव्हता. कोणाचाही संपर्क होत नसल्याने काय झाले असेल या चिंतेत अनेकजण वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र संपर्क होत नव्हता. अशा अवस्थेत केवळ भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवेचा महापुरात अकडलेल्या लोकांना आधार होता. याच बीएसएनएलवर पुरकाळातही संकटाच्या वेळी संपर्कात आले. या काळात केवळ बीएसएनएलने सुरळीत सेवा देवून लोकांना संपर्कात ठेवले. त्यामुळे `माणस जोडणारी माणस` हे ब्रिदवाक्य घेवून स्पर्धेत उतरलेल्या ऱ्या बीएसएनएलने पुन्हा एकदा आम्ही संकटातही माणस जोडून ठेवण्याचे काम केले हे पुन्हा एकदा सिध्द करुन दाखविले आहे. या महापुराच्या संकटकाळी मदत करणाऱ्या बीएसएनएलचे अनेकांनी आभार मानले. 
            जेथे कोणी पोहचू शकत नाही, तेथे बीएसएनएलची सेवा खेड्यापाड्यात मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी आपले बीएसएनएलचे मोबाईल नंबर बदलले नाहीत. खेड्यापाड्यातील कानाकोपऱ्यात आजही बीएसएनएल आपली सेवा पुरवत आहे. पुरकाळात मोबाईल सेवा ठप्प झाली होती. अन्य खासगी कंपनीचे सेवा बेभरवशाची बनली होती. या अशा अडचणीच्या काळात मात्र बीएसएनएनने मोबाईल व लॅन्डलाईन सेवेद्वारे लोकांना संपर्कात ठेवण्याचे मोलाचे कार्य केले. मुसळधार पावसामुळे मोबाईल कव्हरेज मिळत नसल्याने बाहेरगावी असलेल्या आपल्या नातेवाईकांना संपर्क करण्यासाठी धो-धो पडणाऱ्या पावसातही गावाबाहेर येवून बीएसएनएलच्या मदतीने संपर्क साधला. वीजपुरवठा खंडीत असूनही बीएसएनएलने पुरकाळात सेवा दिल्याने याबद्दल सर्वच स्तरावर बीएसएनएलच्या सेवेबद्दल लोकांतून समाधान व्यक्त होत आहे. केवळ बीएसएनएलची सेवा मिळत असल्याने अनेकांनी दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टरच्या बॅटरीवर मोबाईल चार्ज करुन बीएसएनएलचे सीमकार्ड असलेल्या व्यक्तींचे सीमकार्ड त्यात टाकून आपल्या घरच्यांशी संपर्क साधला. यावेळी बीएसएनएलचे सीम असणाऱ्यांना शोधून त्यांचे मोबाईल चार्ज केले जायचे. या महापुराच्या काळात संपर्कासाठी बीएसएनएलने बुडत्याला काडीचा आधारची भूमिका बजावली आहे. सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलला सोडून गेलेल्या अनेकजण पुन्हा बीएसएनएलशी जोडले गेले आहेत. संकटात साथ देणाऱ्या बीएसएनएलचे एकतरी सीम आपल्या घरात असावे अशी इच्छा अनेकांनी यावेळी व्यक्त केली. या कालावधीत अनेकांनी नवीन बीएसएनएलचे सीम खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काहींनी ती न मिळाल्याने पुर ओसरल्यानंतर अनेकांनी बीएसएनएल सीम खरेदी केले. 

                                            बीएनएसएलने जपली सामाजिक बांधिलकी..............
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुरसग्रस्तांसाठी बीएसएनएलने आठवडाभर मोफत सेवा देवून सामाजिक बांधीलकी जपली आहे. हि सुविधा ग्राहकांना 10 आगस्टपासून लागू झाली आहे. यामध्ये ग्राहकांना बीएसएनएलच्या मोबाईलधारकांना परस्परांशी अमर्याद मोफत कॉल व बीएसएनएल व्यतीरिक्त दररोज वीस मिनिटे मोफत मिळतील. दररोज शंभर एसएमएस आणि एक जीबी डाटाही विनाशुल्क दिला आहे. 


No comments:

Post a Comment