चंद्रसेन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने स्वातंत्रदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2019

चंद्रसेन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने स्वातंत्रदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

चंदगड येथील चंद्रसेन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने स्वातंत्रदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरावेळी उपस्थित राज्य माथाडी कामगार अध्यक्ष शिवाजीराव पाटील, पं. स. सदस्य दयानंद काणेकर, समीर पिळणकर, मनोहर गडकरी यांच्यासह कार्यकर्ते. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड शहरांमधील चंद्रसेन मंडळातर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली 15 वष॔ दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते. मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चंदगड ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रक्तदान शिबीराचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिरामध्ये 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या वेळी नगरपंचायत सफाई कामगारांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याने उपक्रमशील मंडळ अशी या मंडळाची ओळख आहे. या कार्यक्रमावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पिळणकर, संजय गांधी निराधार अध्यक्ष सुनिल काणेकर, प्रविण वांटगी, गजानन पिळणकर, सचिन नेसरीकर, शशिकांत मांगले, सुभाष गावडे यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment