नागपंचमीनिमित्त सोमवारी चंदगड मधील सलून दुकाने बंद - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2019

नागपंचमीनिमित्त सोमवारी चंदगड मधील सलून दुकाने बंद


कालकुंद्री / प्रतिनिधी
नागपंचमी सणानिमित्त चंदगड तालुक्यातील सर्व हेअर कटींग सलून दुकाने 5 आॅगस्ट 2019 रोजी बंद ठेवण्याचा निर्णय नाभिक समाज महामंडळ चंदगड तालुका शाखेच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बामणे, तालुकाध्यक्ष हणमंत जाधव व पदाधिकाऱ्यांनी  दिली आहे.
 नाभिक समाज नागवंशी असल्यामुळे हा सण समाजासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. पूर्वीपासून गावोगावी चिखल मातीच्या नागदेवतेची प्रतिकृती बनवून त्याची पूजा केली जाते. साप हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून तो मित्र आहे. अशाप्रकारे नाभिक समाज नेहमीच समाजाचे प्रबोधन करत आला आहे. त्यामुळे या दिवशी सर्व नाभिक समाज बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवावीत असे अवाहन चंदगड तालुका नाभिक समाज सुधारणा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment