संजय पाटील, तेऊरवाडी
लकिकट्टे (ता. चंदगड) येथे आज सकाळी दहा वाजता इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी कु. संस्कार संदिप पाटील याचे अज्ञात दोन युवकानी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान राखत संस्कारच्या दोन मित्रानी अपहरणाचा डाव क्षणात उधळून लावल्याने मोठा अनर्थ टळला. भर दिवसा घडलेल्या या घटनेने चंदगड तालूक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आज सकाळी दहा वाजता संस्कार आपले मित्र अर्नव सागर रेडेकर व ओमकार हणमंत चिगरे यांच्या सोबत मलतवाडी रस्त्यालगत असणाऱ्या मराठी विद्यामंदिरकडे येत होते. यावेळी पल्सर गाडीवरून आलेल्या दोन युवकानी शाळेकडे जाणाऱ्या संस्कार जवळ जाऊन गाडी समोर उभा केली. यातील एक युवक गाडीवर बसला होता तर दुसऱ्या युवकाने संस्कार वर गोणी टाकून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने संस्कार व त्याचे दोनी मित्र घाबरले . पण क्षणात प्रसंगावधान राखून अमर व ओमकार यांनी संस्कारला घट्ट पकडून ठेवून मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा केला. त्यामुळे दोन्ही अपहरणकर्ते संस्कार तेथेच सोडून माणगावच्या दिशेने भरदाव वेगाने निघून गेले. आरडाओरडा ऐकून शेजारील लोक जमा होईपर्यंत ते अनोळखी युवक निघून गेले. अर्नव व ओमकार यानी जर संस्कारला मदतीचा हात दिला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. या मुलांच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. या घटनेची माहिती माहिती मिळताच तात्काळ चंदगड चे पो . निरिक्षक सातपुते व उपनिरीक्षक पी. एस. वाघ यानी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली. पोलीसांनी यासंदर्भात चंदगड तालूक्यात गाड्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.
मागील वर्षीही याच परिसरातील शिवनगे गावामध्ये एका शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न झाला होता . वर्षभरानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने पालक वर्गात घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी यासंदर्भात चंदगड तालुक्यात गाड्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.

5 comments:
Shodun kadun Tyan shasan kara
Mhanje gavi suddha lahan mule surakshit nahit
Ashana kadak shiksha karayala havi
Ashya nalaykana changlich adal gadvli
Pahijet,he krutya shahrat hotat ase vatat hote pan ata gavi pan far praman vadnyachi shakyata disat ahe,lahan mulana sambhalan far garajech vatat ahe.ashyana changli kadak shikshya zali pahije.
Direct tyache 2 hath aani 2 pay kapun taka parat lahan mulache apaharan karayache kunacha dokyat pan yenar nahi
Post a Comment