![]() |
तेऊरवाडी येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देताना उपसरपंच सौ . शालन पाटील , सदस्य राजेंद्र भिंगुडे व इतर. |
तेऊरवाडी / प्रतीनिधी
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे कोल्हापूरचे पालकमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देऊन अतिवृष्ठीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी तेऊरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील याना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
तेऊरवाडी गाव पुरग्रस्थ नसले तरीही मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने तेऊरवाडी गावातील घरामध्ये ओढयाचे पाणी घुसल्याने अनेक घरांची पडझड झाली . त्याबरोबरच ओढयानी मार्ग बदलल्याने शेतीची अपरिमित हानी झाली आहे . शासनाकडे कोरडवाहू गाव म्हणून नोंद असलेल्या या गावाला इतक्या प्रचंड पावसाला सामोरे जाताना शेतकरी वर्ग हतबल झाला .पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने येथील डोंगर उतारावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे . कोरडवाहू शेती करणाऱ्या येथील शेतकरी पूर्णत : खचला आहे . आज चंद्रकांतदादा पाटील यानी ग्रामस्थाना भेट देवून मदतीचे आश्वासन दिले . ग्रामपंचायत सरपंच सुगंधा कुंभार , उपसरपंच सौ . शालन पाटील , सदस्य राजेंद्र भिंगुडे , तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश दळवी यानी पालकमंत्री श्री पाटील याना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
No comments:
Post a Comment