बेळगाव येथे रविवारपासून सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संगीत भजन स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2019

बेळगाव येथे रविवारपासून सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संगीत भजन स्पर्धेचे आयोजन


बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील गणपत गल्ली येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे श्रावण मास निमित्त आयोजित संगीत भजन स्पर्धा रविवार 25 ते 29 ऑगस्ट 2019 या कालावधीत आयोजित केल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत व कार्यवाह नेताजी जाधव यांनी दिली.
रविवारपासून दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत स्पर्धा होतील. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला किर्तन केसरी सागर महाराज वोराटे (नातेपोते, जि. सोलापूर) यांच्या हस्ते रविवारी दुपारी साडेतीन वाजता गोगटे रंगमंदिर,  गणेशपुर रोड, कॅम्प बेळगाव येथे होणार आहे. यावेळी वोराटे यांचे व्याख्यान व कीर्तनाचा कार्यक्रम होईल. भजन स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्ष असून बेळगाव शहरासह बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यासाठी ही स्पर्धा मर्यादित आहे. सदर स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटात होणार आहे. आतापर्यंत महिला गटात 22 व पुरुष गटात अशा 38 भजन मंडळानी नाव नोंदणी केली आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन वाचनालयाचे व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment