चंदगड / प्रतिनिधी
पोलिसदला मार्फत दिला जाणारा गणराया ॲवार्ड 2018 या पुरस्काराचे वितरण 26 आगस्ट 2019 रोजी सकाळी अकरा वजात चंदगड येथील नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे. गडहिंग्लजचे नूतन पोलिस उपअधिक्षक अंगद जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहीती पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांनी दिली. वितरण कार्यक्रमाला प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, सभापती बबन देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. तालुक्यातील मंडळाचे कार्यकर्ते, सरपंच, पोलिस पाटील यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पोलिस ठाण्याच्या वतीने केले आहे. http://www.mhpolice.maharashtra.gov.in या लिंकवरुन गणेश मंडळांनी परवाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे असे सुचित केले आहे.
No comments:
Post a Comment