माजी खासदार राजू शेट्टी पुरग्रस्तांच्या भेटीसाठी रविवारी चंदगड दौऱ्यावर - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2019

माजी खासदार राजू शेट्टी पुरग्रस्तांच्या भेटीसाठी रविवारी चंदगड दौऱ्यावर

माजी खासदार राजू शेट्टी
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कोल्हापूर,  सांगलीसह अन्य जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातले होते. अनेक घरांची पडझड होवून व्यापाऱ्यांच्या दुकानांसह शेतीचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. हे पुरग्रस्त बांधव अडचणीत आहेत. या पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे रविवारी 25 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी दहा वाजता चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. श्री. शेट्टी हे चंदगड तालुक्यातील राजगोळी, दुंडगे, कोवाड, निट्टूर, कोनेवाडी, चंदगड भागातील शेतकरी, छोटे मोठे उद्योजक, व्यापारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. दौऱ्यावेळी राज्यसचिव राजेंद्र गड्डयान्नावर, तालुका अध्यक्ष बाळाराम फडके, माजी सभापती जगन्नाथ हुलजी, युवा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवा अध्यक्ष शशिकांत रेडेकर उपस्थित रहाणार आहेत. शेतकरी, व्यापारी व उद्योजक दौऱ्यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. दिपक पाटील यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment