चंद्रभागा पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा कोवाड येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2019

चंद्रभागा पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा कोवाड येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

चंद्रभागा पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना केंद्रीय शाळेतील शिक्षक व विद्यार्थी.
कालकुंद्री / प्रतिनिधी 
कोवाड (ता. चंदगड) येथील अंगणवाडी सेविका श्रीमती चंद्रभागा मष्णू पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त गावातील केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच चार अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. केंद्र शाळा मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी चंद्रभागा यांना पुष्प देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी नंदकुमार पाटील अध्यापक गणपती लोहार, श्रीकांत आप्पाजी पाटील, भावना अतवाडकर उज्वला नेसरकर, मधुमती गावस, कविता पाटील, अंगणवाडी सेविका रमेजा मुल्ला, अनुराधा खोराटे व सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आभार गणपती लोहार यांनी मानले. 

No comments:

Post a Comment