दाटे नजिक रस्त्यावर पाणी आल्याने बेळगाव-वेगूर्ला महामार्गावरील वहातूक बंद |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात आज दिवसभर पावसाने जोर वाढवला आहे. कालच्या पेक्षा दुप्पटीने पावसाच्या जोरदार सरी वर सरी कोसळत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा पडद्यांना पूर आला आहे.दाटे नजिक रस्त्यावर पाणी आल्याने बेळगाव-वेंगुर्ले वहातूक बंद आहे. तर कोवाड येथील बाजारपेठेत पाणी विसरल्यामुळे व्यापारासाठी त्रेधातिरपट उडाली आहे. ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कोनेवाडी,हल्लारवाडी ,आसगाव तर घटप्रभा नदीवरील भोगली,गवसेना,कानडी,हिंडगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासात तालुक्यात सरासरी 96.16मि.मी तर आतापर्यंत 1599.5मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. .जंगमहट्टी व फाटकवाडी या मध्यम प्रकल्पासह दहा प्रकल्पापैकी जेलूगडे,पाटणे,आंबेवाडी, सोनारवाडी,निट्टूर, किटवाड क्र. 1व2 व ,काजिर्णे हे तलाव शंभर टक्के भरले आहेत.मूसळधार पाऊसाने तालूक्यातील 8घरांची पडझड होऊन एक लाख 37000 हजारांचे नुकसान झाले आहे.
तावरेवाडी येथील कल्पना शांताराम हसबे यांच्या घराची भिंत कोसळून 15000 चे नुकसान 2)मौजे बसर्गे येथील सटूपा वैजू कलखांबकर यांच्या घराची भिंत कोसळून 25000 नुकसान 3)मौजे कालकुंद्री येथील पर्वती कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून 10000 चे नुकसान 4)मौजे निटूर येथील पुंडलिक विटोबा कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून 15000 चे नुकसान 5) मौजे दाटे येथील यल्लूबाई शिवापा बुरुड यांच्या घराची भिंत पडून 15000 चे नुकसान 6)मौजे भोगोली येथील शांता गोपाळ गावडे यांच्या घराची भिंत कोसळून 25000 चे नुकसान 7)मौजे तुडिये येथील जोतिबा सटुपा शिपूरकर यांच्या घराची भिंत कोसळून 20000 चे नुकसान 8)मजरे कार्वे येथील कृष्णा धाकलू सुतार यांच्या घराची भिंत कोसळून 12000 चे नुकसान. मंडलनिहाय पाऊस पुढीलप्रमाणे चंदगड -121मिमी (1936) नागणवाडी -66मिमी(1455)माणगाव -50मिमी (726)कोवाड -35मिमी (650)तुर्केवाडी -121मिमी (1597)हेरे -184मिमी (2691). तालुक्यात सरासरी 96.16 मिमी तर आज अखेर सरासरी -1599.5 मिलीमीटर पावासाची नोंद झाली आहे.
ताम्रपर्णी नदी चे कोवाड बाजारपेठेत घुसलेले पाणी. दुसऱ्या छायाचित्रात पाण्याखाली गेलेला कोवाड बंधारा. |
कोवाड बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी, कर्यात मधील शेकडो एकर शेती पाण्याखाली
कोवाड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे पूर्व भागातील कोवाड बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. तर नदीच्या पलीकडे कोवाड स्टॅन्ड नजीक बेळगाव मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून अतिवृष्टीमुळे कोवाड येथिल कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा पाण्याखाली आहे. तथापि चार वर्षांपूर्वी नवीन बांधण्यात आलेल्या पुलामुळे गडहिंग्लज, नेसरी, कोवाड ते बेळगाव वाहतूक सुरळीत सुरु आहे. परिसरातील किटवाड व निटूर येथील सर्व चार लघु पाटबंधारे धरणे भरल्यामुळे तसेच जंगमहट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे कोवाड नजीक किणी कोवाड स्टॅन्ड व किनी रस्त्याच्या सखल भागात रस्त्यावर पाणी आले आहे. पाऊस वाढल्यास बेळगाव व किणी, ढोलगरवाडी मार्गावरील वाहतूक बंद होणार आहे. तसे झाले तर नागपंचमीनिमित्त ढोलगरवाडी ला जाणाऱ्या या भाविक व सर्प प्रेमींच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. पुरामुळे कर्यात भागातील शेकडो एकर जमीन गेले काही दिवस पाण्याखाली आहे त्यामुळे भात व ऊस पिकांना धोका निर्माण झाला आहे. या भागात ऊस पिकावर झालेला हुमनी, रोटा चा प्रादुर्भाव शेतीत पाणी साठल्यामुळे कमी होईल असा शेतकऱ्यांचा अंदाज फोल ठरल्याची माहिती किणी येथील प्रगतशील शेतकरी संजय कुट्रे यानी सांगितली. त्यांनी आपल्या पाण्यात बुडालेल्या उसाच्या मुळातील रोटा इतके दिवस पाण्याखाली राहूनही तसाच जिवंत असल्याचे लक्षात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या भात पिकांची परिस्थिती चांगली असली तरी त्यांची जोमाने वाढवण्यासाठी पावसाच्या उघडीपी ची वाट शेतकरी पाहत आहेत.
No comments:
Post a Comment