पाऊस पिसाळला, कोवाड बाजारपेठ पाण्यात बुडाली, चंदगडच्या कॅलेज रोडवर तीन फुट पाणी, सर्व रस्ते बंद, रुग्णांचे हाल - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2019

पाऊस पिसाळला, कोवाड बाजारपेठ पाण्यात बुडाली, चंदगडच्या कॅलेज रोडवर तीन फुट पाणी, सर्व रस्ते बंद, रुग्णांचे हाल

चंदगड शहराच्या काॅलेज रोडवर आलेले पुराचे पाणी. पुर पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला असून पाऊस पिसाळला असल्याचे बोलले जात आहे. आज सकाळपासून धो-धो पाऊस पडत आहे. त्यामुळे पुराचे पाणी चंदगड शहारातील कॉलेज रोडवर आल्याने हॉटेल, दुचाकी शोरुम, मॉल, दुकाने व काही घरे पाण्याखाली गेल्याने घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंदगडच्या मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. पुराच्या पाण्यात अनेकांनी भिजण्याचा आनंदही लुटला. चंदगड शहरातून बाहेर जाणारे सर्व रस्ते बंद असल्यामुळे उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात 136.83 तर आतापर्यंत 1949.66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात 25 घरांची पडझड होवून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
        कोवाड येथे पाण्याखाली गेलेल्या बाजारपेेठेत लोकांना बाहेर काढणारी रेस्क्यु टीम
तालुक्याच्या कोवाड बाजारपेठेत पुराने हाहाकार माजविला आहे. अनेक दुकाने पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी पुराच्या पाण्यात घरामध्ये अडकलेल्या अनेक लोकांना रेस्क्यु टिमने घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. कोवाड बाजारपेठ ताम्रपर्णी नदीला लागून असल्याने पुराचा सर्वांधिक फटका या बाजारपेठेला बसला. कोवाड येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमसेंटवरमध्येही पाणी शिरले आहे. अनेक दुकाने पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. 
कोवाड येेथे रेस्क्यु टीमने माणसासोबत प्राण्यांचेही प्राण वाचविले.

कोवाडमधील जनजीवन विस्कळीत झाले असून दुकानदारांनी दुकानातील साहित्य शक्य तितके अन्यत्र सुरक्षित स्थळी हलविले आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षातील उच्चांकी पाऊस असल्याचे वयोवृध्द जाणकार मंडळींचे म्हणने आहे. चंदगड तालुक्यात मोठी अशी असलेली कोवाड बाजार पेठ पूर्णतः पाण्यामध्ये बुडली आहे. बाजार पेठेतील निट्टूर रोड तसेच नदी पलिकडील प्रत्येक कोपरा न कोपरा आज  पाण्याखाली गेला आहे. दुर्गामाता मंदिर ते जुन्या बंधाऱ्यापर्यतचा संपूर्ण भागावर सगळीकडे पानीच पाणी दिसत आहे. या ठिकाणी काल गुडग्यापर्यंत असलेले पानी आज कमरेच्यावर पोहोचले आहे. 
कोवाड येथे पाहणी करताना. 
या भागातील सर्व दुकाने ही गेल्या दोन दिवसा पासून बंद आहेत. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बरेच लोक हे किणी तसेच कागनी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. जिल्हाधिकारी कोल्हापुर, प्रांताधिकारी गड व चंदगडचे नायब तहसीलदार चंदगडचे डी. एम. नांगरे यांच्या सहकार्यतुंन गड नागरपालिकेची आपदा टीम केलेल्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये जवळ पास 15 स्त्रिया अणि 17 पुरुष अशा 32 जनांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. यावेळी आपदा मित्र कमलेश जाधव, बारामते व टीम यांनी वाहत्या पाण्यातुन या सर्व जनांची सुटका केली.  या अगोदर सकाळी किणीचे पांडुरंग मोहंगेकर व त्यांच्या सहकाऱ्यानी तिघांना सुखरूप जागी पोहोचविले. यावेळी माणगांव व कोवाड बिटचे सर्कल विजय पोतदार, कोवाड तलाठी दीपक कांबळे, राहुल सामंत, उपसरपंच विष्णु आडाव, अर्जुन वांद्रे, शिवानंद अंगड़ी व मोठ्या संखेने ग्रामस्थ हजर होते.
कोवाड येथे रेस्क्यु टीम पाण्यातून लोकांना मदत करताना.
                                         
                     अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे वीज ,मोबाईल नेही गायब,गोकुळ चे दूध संकलन बंद
मुसळधार अतिवृष्टीने ताम्रपर्णी नदीला आलेल्या पूराचे पाणी जवळपास चंदगड च्या जून्या बसस्टॉपवर आले. 35 वर्षानंतर असे पूराचे पाणी चंदगड च्या जून्या बसस्टॉपवर आल्याचे जेष्ठ नागरिकांनी सांगितले. कारवे, सातवणे, तांदुळवाडी येथे जूनाट वृक्ष कोसळल्याने वहातूक टप्पे होती. तालुक्यातील सर्वच रस्त्यावर पाणी आल्याने तालुक्यातील दूध संस्थानी आज व उद्या बुधवारी सकाळी दूध संकलन बंद केले आहे. यामुळे शेतकर्याचे 70 हजार लिटर दूध वाया गेले. विज वितरणच्या  हलकर्णी व माणगाव उपकेंद्राचा अपवाद वगळता तालूक्यातील विज पुरवठा खंडीत आहे. मोबाईलचे नेटवर्कही खंडीत आहे. कोवाड,बागिलगे व धुमडेवाडी, नरेवाडी,माणगाव, दुंडगे, कूदनूर, आदी नदी काठाजवळच्या गावातील घरातून पाणी शिरले आहे.तालूक्यातील टि.व्ही ची केबल तूटल्याने  आठ दिवस प्रक्षेपण नाही. झांबरे, जंगमहट्टी मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सूरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेने इशारा दिला आहे.

                                      चंदगड तालुक्यात घरांच्या भिंडी पडून झालेले नुकसान
मौजे हलकर्णी येथील गुणवंती गुंडू भातकांडे घराची भिंत कोसळून 15000 नुकसान, मौजे देवरवाडी येथील महेश  मल्लाप्पा कांबळे घराची भिंत कोसळून 15000 नुकसान, मौजे शिनोळी बु येथील दुर्गापा मषनु डागेकर यांच्या घराची भिंत पडून 20000 नुकसान, मौजे कानूर खू येथील गंगुबाई गंगाराम कांबळे यांच्या घराची छप्पर कोसळून 30000 नुकसान, मौजे शिनोळी खु येथील बाळू कोणेरी मनोलकर यांच्या घराची भिंत कोसळून 25000 नुकसान, मौजे मळवीवाडी येथील आनंदी कृष्णा पाटील यांच्या घराची भिंत पडून 40000 नुकसान, मौजे शिनोळी बु येथील परशराम नारायण बोकमुरकर यांच्या घराची भिंत पडून 15000 नुकसान, मौजे कोलिक येथील सटू रामा गावडे यांच्या घराची भिंत कोसळून 25000 नुकसान, मौजे कोलिक महादेव रामा गावडे घराची भिंत पडून 25000 नुकसान, मौजे तळगुळी येथील मोनेश्वर सनाप्पा नाईक यांच्या घरची भिंत पडून 50000 नुकसान, )मौजे तळगुळी येथील गुलाब हुसेन शमनूचे घराची भिंत पडून 100000 नुकसान, मौजे तळगुळी अहमद जुवेर अब्दुलअजीज काझी घराची भिंत कोसळून 60000 नुकसान, मौजे तळगुळी येथील महंमदशाकीर नजीरअहमद काझी घराची भिंत कोसळून 70000 नुकसान, मौजे कुदनूर येथील पुंडलिक मारुती ओऊळकर घराची भिंत कोसळून 50000 नुकसान, मौजे कुदनूर येथील मारुती रावजी बबरगेकर यांच्या घराची भिंत कोसळून 30000 नुकसान, मौजे कुदनूर येथील वैजू जोतिबा मोहनगेकर घराची भिंत पडून 50000 नुकसान, मौजे कुदनूर दत्तू रामा हेब्बाळकर घराची भिंत कोसळून 25000 नुकसान, मौजे कुदनूर शांता नागोजी तलवार घराची भिंत कोसळून 125000 नुकसान, मौजे कुदनूर येथील मिरासाब  खुतबू जमादार घराची भिंत कोसळून 25000 नुकसान, मौजे कोवाड येथील बशीर रजाक आलाखान घराची भिंत पडून 45000 नुकसान, मौजे पुंद्रा येथील अनंत वर्गावकर यांच्या घराची भिंत कोसळून 25000 नुकसान, मौजे कुदनूर येथील निंगापा रामू मुतकेकर यांच्या घराची भिंत कोसळून 20000 नुकसान, मौजे देवरवाडी येथील भुजंग कृष्णा करडे यांच्या घराची भिंत कोसळून 25000 नुकसान, मौजे शिनोळी खु मारुती बाबू चौगुले घराची भिंत कोसळून 10000 नुकसान, मौजे खालसा कोळींद्रे येथील बाळू भिकू पाटील घराची भिंत पडून 25000 नुकसान.

No comments:

Post a Comment