कोवाड येथील तरुणांनी निट्टूर रोडवरील अनेक कुटुंबांचे प्राण वाचविले. |
संजय पाटील / कोवाड
स्वतः च्या जीवावर उदार होउन कोवाड मधील युवक वर्गाने कोवाड ते निट्टूर या मार्गावर राहत असलेल्या अनेक कुटुंबाना महापुराच्या तङ्ख्यातुन सुखरूप स्थळी आणून सोडले. गेले चार दिवस कोवाड तसेच कर्यात भागात पावसाने थैमान घातले असल्यामुळे भयानक सगळीकडे अशी पुराची स्थिति उदभवली आहे त्यामुळे काल पर्यन्त निट्टूर कोवाड रोड रोड वरील सर्व इमारतींचे खालचे मजले पाण्या खाली गेले होते.
त्यामुळे सर्व कुटुंबे ही वरच्या मजल्यावर स्थलांतरीत झाले. या इमारती मधील कुटुंबाना वेगाने वाढत असलेल्या पाण्याची कल्पना न आल्याने अणि पाण्याची पातळी ही वेगाने वाढल्या मुळे ही सर्व कुटुंबे भयभीत झाली.
अशा सर्व परिस्थितीत त्यानी कोवाड मधील युवकाना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर गावातील सर्व तरुण वर्ग या सर्वांच्या मदतीसाठी एकवटला. जोरदार वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाह व वाढणारे पानी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यानी प्रथमताः अड़कलेल्या कुटुंबापर्यंत पोहत जाऊन सर्वाना धीर दिला व रस्त्याच्या एकेका बाजूने दोरखंड बांधून घेऊन एखा मोठ्या भांड्यातुन प्रत्येक वेळी 2 ते 3 मेंबर अश्या प्रकारे सर्वांची सुटका केली. सर्वा समोर आदर्श ठेवला. या सर्व बचाव कार्यात प्रामुख्याने सुधीर पाटील, रणजीत भातकंडे,प्रमोद वांद्रे,पुंडलिक चोपड़े,अमित भोगन, रामा पाटील, राजाराम वांद्रे,इल्ल्या वांद्रे,सतीश सुतार,श्रीकांत पाटील, मनु पोवार, गनपा भोगन,जोतिबा व्हन्यालकर, बालू भोगन या सर्व युवकानी सहभाग दाखविला.
No comments:
Post a Comment