कोनेवाडीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मराठी अध्यापक संघाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2019

कोनेवाडीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मराठी अध्यापक संघाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

मराठी अध्यापक संघाच्या वतीने कोनेवाडीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
नागनवाडी / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ (कोजीम) यांच्यावतीने चंदगड तालुक्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कोनेवाडी येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
 गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. चंदगड तालुक्यात आलेल्या महापुरामुळे अनेक गावांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना अनेक प्रकारची मदत अनेक सामाजिक संघटना करत आहेत. पण या महापुरामुळे अनेक शालेय विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. याची दाहकता लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांनी आवाहन करून निधी उभारून शैक्षणिक साहित्य जमा केले. आज चंदगड तालुक्यातील पुरामुळे सर्वात जास्त नुकसान झालेल्या या गावातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, रंगपेटी इ. शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कोनेवाडी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलेबद्दल सरपंच ज्ञानदेव गावडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गोंधळी, राजेंद्र पाटील, मदन निकम,पी डी पाटील, अरुण कुंभार,चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव शिवणगेकर, संजय साबळे,हणमंत पाऊसकर, रवी पाटील, बी एम पाटील,जी एन धुमाळे, पी एस मगदूम आदी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास धुमाळे,विष्णू गावडे, बाळू कडुकर, परशराम गावडे, परशराम धुमाळे, देवाप्पा कडुकर, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              (वृत्त संकलन - प्रशांत मगदूम, नागनवाडी)

No comments:

Post a Comment