कळसगादे धनगरवाडा महावितरणाचे दुर्लक्षामुळे महिनाभर अंधारात - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2019

कळसगादे धनगरवाडा महावितरणाचे दुर्लक्षामुळे महिनाभर अंधारात


चंदगड / प्रतिनिधी
कळसगादे (ता. चंदगड) येथील धनगरवाड्यावर गेल्या महिनाभरापासून वीज गायब असल्याने ग्रामस्थांना अंधारातच वावरावे लागत आहे. त्यामुळे महावितरणाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कळसगादे पासून एक ते दिड कीलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाड्यात गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. यापूर्वीही काही वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी धनगर समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्यावर महावितरणाने दखल घेऊन पुन्हा वीजपुरवठा सुरळीत केला होता. पण आता पुन्हा एक महिनाभर धनगरवाड्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे तब्बल एक महीना धनगर समाज बांधव आंधारात आहे असल्याचे बाबू बमू लांबोर यांनी सांगितले. या ठिकाणी असलेल्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे श्री.  लांबोर यांनी सांगितले.

या धनगरवाड्यावर नऊ कुटुंबात सुमारे पंचावन्न लोक राहतात. त्यात आठ ते दहा शाळकरी विद्यार्थी आहेत. तसेच चार वृध्दही आहेत.  विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अवघड होत आहे. या परिसरात जंगली जनावारांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरीकांना भितीच्या वातावरणात दिवस काढावे लागत आहेत. नगरवाड्यातील सात-आठ कुत्र्यी जंगली प्राण्यांनी हल्या मारली गेली आहेत. महावितरणाकडून त्वरित दखल घेतली नाही तर नाविलाजाने कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा धनगरवाड्यावरील नागरीकांनी दिला आहे. 


No comments:

Post a Comment