कोवाड महापूरातील देवदूत , कोवाड महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2019

कोवाड महापूरातील देवदूत , कोवाड महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी

पुर ओसरल्यानंतर परिसराची स्वच्छता करताना कोवाड महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी.
तेऊरवाडी / संजय पाटील 
कोवाड (ता . चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एनएसएस विभागाने परिसरात आलेल्या पुरामध्ये चोवीस तास देवदूत बनून पुरग्रस्थाना मदत केली. महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी व प्राध्यापक पुर आल्यापासून ते आज पर्यंत अहोरात्र पुरग्रस्थांच्या मदतीला देवदूताप्रमाणे धावून जात आहेत . हडलगे ग्रामपंचायतीत येणाऱ्या  व  घनदाट जंगलात पाच  किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या
लमान वाडयातील लमान जमात केवळ २५ घरांची वस्ती. घटप्रभा नदीच्या काठावर असलेल्या या लमान वस्तीला पुराचा प्रचंड तडाखा बसला. 

प्रा. डॉ. आर. डी. कांबळे (एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी), डॉ .के.पी. वाघमारे.डॉ.ए.के. कांबळे हडलगे गावातील विष्णु पाटील यांच्यासमवेत वाडयाच्या दिशेने चिखल, पाणी, दगड. धोडयातून जीवघेणा प्रवास करून या लमान वस्तीला मदतीचा हात दिला. पुर काळात तर महाविद्यालयाच्या संयसे कानी शक्य तेवढी पुर ग्रस्थाना मदतीचा हात दिला . कोणी पुराच्या पाण्यात उतरून अनेकाना जीवनदान दिले तर काहीनी पुरग्रस्थांचे साहित्य  दुसऱ्या ठिकाणी हलवायला मदत केली. पुर ओसरल्यानंतर तर कोवाड मधील स्वच्छतेचे आवाहन सुद्धा यशस्वीपणे पार पाडले. 

घरातील , गटरातील , गल्लीतील सगळा चिखल , प्लास्टीक जमा करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम आजही अखंडपणे चालू आहे . त्याबरोबरच बचावकार्य , आरोग्य तपासणी , संसार पयोगी वस्तू सच्छता मोहिम , पुर ग्रस्थांना मदत केंद्र , या संबधीत संघटना , तरूण मंडळे , एनजीओ , आरोग्य विभाग  , शासन यांच्या समन्वयातून अखंडपणे कार्य चालू आहे . कोवाड , तेऊरवाडी ,निटूर,लमान वाडा ,दुंडगे , चंदगड पूर्व भाग या परिसरात जीवन उपयोगी वस्तू , कापड , सॅनिटरी नॅपकिन आदि वस्तु पोहचावल्या. यामध्ये प्राचार्य डाॅ .एस.एम. पाटील , अध्यक्ष डॉ . ए .एस. जांभळे , सचिव एम .व्ही. पाटील , डॉ .आर.डी. कांबळे सर्व महाविद्यालय कर्मचारी देवदूत बनून कार्यरत आहेत . त्यांच्या या अखंड सेवेबद्द्ल पुरग्रस्ताकडून आभार व्यक्त होत आहे.
संजय पाटील, तेऊरवाडी

No comments:

Post a Comment