![]() |
विविध मागण्यांसाठी अलबादेवी ग्रामस्थांचे २६ ऑगस्टपासून आंदोलन सुरु करणार होते. पण सकारात्मक निर्णयावर आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले असे श्रीकांत नेवगे यांनी सांगितले. सभापती बबन देसाई व विस्तार अधिकारी श्री. आंळदे यांच्याशी ग्रामस्थांची सकारात्मक चर्चा झाल्यावर उपोषण स्थगित करण्यात आले. सुमारे ५००००लिटर क्षमतेची नादुरुस्त पाण्याची टाकी कधीही कोसळून जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अनेक वेळा सदर बाब ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीचे पाणीपुरवठा वरिष्ठ अधिकारी यांच्या कानावर घातली असुन देखील त्यांच्या कडून काहीच कार्यवाही झाली नाही. तसेच अलबादेवी-अडकूर हा रस्ता पुर्ण पणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. या प्रमुख मागणीसह अनेक बाबींवर चर्चा करुन ठोस उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी गेल्या चार महिन्यापासून श्रीकांत नेवगे याच्यासह ग्रामस्थांनी सभापती बबन देसाई यांच्या कडे करुन प्रसंगी २६ ऑगस्टपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन सभापती देसाई यांनी दिनांक २४ ऑगस्ट 2019 रोजी विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.
No comments:
Post a Comment