![]() |
अतिवृ्ष्टी व वादळी वाऱ्यामुळे कोवाड (ता. चंदगड) येथे पडलेले घर. |
गेल्या आठ दिवसापासून कोसळत असलेल्या धुँवाधार पावसामुळे व विविध प्रकल्पातील चालू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कोवाड परिसरातील व्यापारी व नागरिक पुरते बेजार झाले आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सगळीकडे पुराने थैमान घातले आहे. कोवाड भागात तर पुराच्या पाण्याची पातळी ही सतत वाढतच असल्याने सामान्य जनजीवन पुरे विस्कळीत झाले आहे. तासागनिक वाढणाऱ्या पाण्याची धास्ति नदी शेजारील प्रत्येक कुटुंबानी घेतली आहे. त्यामुळे कोवाडकरांची वरुण राजाला बस झालं आता पुरे कर अशी आर्त हाक दिली आहे.
![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथे घर अर्धे पडले आहे. |
कोवाड बाजारपेठ ही पुराच्या पाण्याखाली गेली असून आता बाजार पेठ नजीकच्या घरानाही धोका निर्माण झाला आहे. त्यात भर म्हणून मोबाइलचे नेटवर्क तसेच विजपूरवठा खंडित आहे. संपूर्ण भागातील लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. पाणी कमी न होता दिवसागणीक वाढतच आहे. त्यातच आज पुराचे पाणी नेसरी रोडवरील रस्त्याला लागुन असलेल्या घरांमध्ये शिरले आहे. कोवाड ते नेसरी रोड वरील तुकाराम जोतिबा कोकितकर अणि शंकर जोतिबा कोकितकर यांचे राहते घर पुर्णतः कोसळले आहे.
कोवाड-दुंडगे रोडवर पाणी आल्याने रस्त्यालाच लागुन असलेले चंद्रकांत वांद्रे यांचे घरही कोसळले. वाढत्या पाण्याचा धोका ओळखून नगरपालिका गडहिंग्लज येथील आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने कोवाड निट्टूररोड वरील इमारतीमध्ये अड़कलेल्या काही कुटुंबांची आज सकाळी सुटका केली. परंतु नदीपालिकड़े नविन ब्रीजच्या पुढे असलेल्या काही इमारतीमधील लोक अडकून पडले आहे. मात्र नदीतील पुराच्या जोराच्या प्रवाहामुळे अथक प्रयत्न करूण देखील बचाव कार्य थांबवावे लागले. भागातील नागरिक या सर्व घटनांनी पुरता हवालदिल झाला आहे.
![]() |
वीज मंडळाचे कर्मचारी कोवाडला प्रकाश देण्यासाठी व दुर्घटना होवू नये यासाठी अहोरात्र झटत आहेत. |
ठिकठिकाणी विजेचे पोल पाण्याख़ाली गेले असल्यामुळे संभाव्य धोका ओळखून वायरमन नामदेव मुंडे, नवनाथ सुगावकर, अजय पवार, आकाश जाधव, राजू पाटील, ड्यूटी आॅपरेटर, तुषार गरडे,बाळु राजगोलकर, संतोष पाटील हे सर्व विज कर्मचारी हे गेले चार दिवस कार्यालयातच ठाण मांडून आहेत. यापुढेही पाऊस पडत राहिल्यास अजुन काही दिवस अशीच परिस्थिति राहणार आहे हे निश्चित आहे. गेल्या 50 वर्षामध्ये असा पाऊस अणि अशी पुरस्थिति पहिली नसल्याचे येथील जानकारांचे म्हणणे आहे. गावातील प्रत्येक जन पाऊस थांबुन पुर कमी व्हावा यासाठी आज देवाला साकडे घालताना दिसत आहे.
![]() |
संजय पाटील, कोवाड |
No comments:
Post a Comment