कोवाड येथील कला महाविद्यालयाचा 24 वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2019

कोवाड येथील कला महाविद्यालयाचा 24 वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा

कोवाड येथील कला महाविद्यालयाचा 24 वा वर्धापनदिन कार्यक्रमावेळी बोलताना प्रा. पी. सी. पाटील व इतर मान्यवर.
कोवाड / प्रतिनिधी       
कोवाड (ता. चंदगड) येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचालित कला, वाणिज्य अणि विज्ञान महाविद्यालयाचा 24 वा वर्धापन दिन रविवार (ता. 15) रोजी  महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ ए. एस. जांभले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
गडहिंग्लज येथील लायन्स क्लब मार्फत 10 योगा किट व 2 प्लास्टिक कचरा कुंडी महाविद्यालयास भेट देण्यात आल्या.
वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयात विविध विभागाच्या भित्तीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. शासनाच्या फिट इंडिया, यंग इंडिया मोहिमे अंतर्गत विद्यार्थासाठी 4 किलोमीटर धावणे अणि शिक्षकासाठी 4 किलोमीटर चालने या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या कला गुणाना वाव मिळावा म्हणून रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. व्ही. के. दळवी यांच्या नियोजनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांनी केले. पाहुण्याचा परिचय प्रा. व्ही. के. दळवी यानी करुन दिला. याप्रसंगी प्रा. पी. सी. पाटील, भरमुअण्णा पाटील, प्रा. ड़ॉ. ए. एस. आरबोले तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रा. मायाप्पा पाटील आदीचे शाल,श्रीफळ अणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन संस्थेचे सचिव एम. व्ही. पाटील यांनी केले. गडहिंग्लज येथील लायन्स क्लब मार्फत 10 योगा किट व 2 प्लास्टिक कचरा कुंडी महाविद्यालयास भेट देण्यात आली. 
वर्धापनदिन कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यी व हितचिंतक.
फड़के व मेहता प्रकाशन मार्फत पुरग्रस्त विद्यार्त्याना मोफत पुस्तके देण्यात आली. माजी राज्यमंत्री भरमुआणा पाटील तसेच माजी विद्यार्थी मायापा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. मुख वक्ते प्रा. पी. सी. पाटील यांनी `आजची बदलती शिक्षण व्यवस्था अणि बेरोजगारी या विषयाला हात घालत सद्यस्थितीत समाजातील विदारक गोष्टिकड़े सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी माजी प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश कुंभार, संस्थेचे सर्व संचालक, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, महा विद्यालयातील प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. सुत्रसंचालन प्रा. मोहन घोळसे यांनी केले. आभार प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांनी मानले.

Video स्वरुपातील बातम्या पाहण्यासाठी कृपया आमच्या https://www.youtube.com/chandgadlivenews या लिंकवर क्लिक करा. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरु नका.
अधिक माहीतीसाठी संपर्क - 9421201886, 9922832307, 9420136433.

No comments:

Post a Comment