![]() |
भावेश्वरी माध्यमिक विद्यालयाला वाढदिवसानिमित्य पुस्तके मुख्याध्यापक व्ही.एन .फगरे यांच्याकडे देताना सदानंद पाटील. |
आमरोळी ( ता.चंदगड) येथील भावेश्वरी विद्यालयचे सहा.शिक्षक सदानंद नससू पाटील हे विद्यालयात गेली पंचवीस वर्ष इंग्रजी विषयाचे अध्यापन अतिशय उत्तमरित्या करत आहेत. ते आपला वाढदिवस विविध उपक्रमानी नेहमी साजरा करतात . या वर्षी सुद्धा ५O सावा वाढदिवस उत्साहात साजरा केला गेला . .मात्र या वर्षी सदानंद पाटील यानी आपल्या 50व्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या ग्रंथालयासाठी 25 हजार रुपयांची पुस्तके देवून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला . मूलांसाठी पुस्तके देऊन एक वेगळाच आनंद वाढदिनी मुलांच्यासोबत साजरा केला.अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणे म्हणजे एक प्रकारे शाळेच्या ऋणातून मुक्त होत असल्याचा आनंद त्यानी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही .एन. फगरे , अरूण कुंभार , संजय तुपारे , अर्चना वाईंगडे आदि शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते .
No comments:
Post a Comment