कालकुंद्री / प्रतिनिधी
ऑगस्टच्या
पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुराने तालुक्यात शेती व घरांचे न भुतो
असे नुकसान झाले. यात उंच टेकडीवर वसलेल्या कालकुंद्री गावालाही तडाखा बसला. येथील
अनेक घरांची पडझड झाली शेकडो एकर शेती ओढ्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून गेली तर
तितकेच नुकसान नदीकाठच्या ऊस व भात पिके पुरात कुजून झाले. यातील नुकसानग्रस्त
नागरिकांना मदत करण्याचे आवाहन स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात करण्यात आले होते.
त्याला प्रतिसाद देत गावातून 36 हजार 500 रुपये
निधी जमा झाला होता. तर अमेरिकेत इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले विजय गुंडू पाटील
यांनी 25 हजार
रुपये निधी पाठवून दिला होता. यातून 41 पूरग्रस्तांना रोख रकमेचे वाटप
ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. विविध सेवाभावी संस्थांकडून आलेले धान्य व
संसार उपयोगी साहित्याचे वितरणही या वेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment