हलकर्णी केंद्रशाळेत केंद्र मुख्याध्यापक पद रिक्त, पद भरण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2019

हलकर्णी केंद्रशाळेत केंद्र मुख्याध्यापक पद रिक्त, पद भरण्याची मागणी


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील  केंद्र शाळेत आवश्यक  १६१ पट असतानादेखील केंद्र मुख्याध्यापक पद रिक्त ठेवण्यात आल्याने येथील शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे मुख्याध्यापक पद त्वरित भरावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
सरकारने पट वाढीसाठी  वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. हलकर्णी केंद्र शाळेलगत इंग्लिश मिडियम स्कूल व एक माध्यमिक शाळा असताना देखील पहिली ते सातवीचा पट वाढवण्यात व विद्यार्थी सातवीपर्यंत रोखून ठेवण्यासाठी  प्रयत्न केले. त्यानुसार सध्या एक ते सातचा १६१ पट असतानादेखील गेले दोन वर्ष केंद्र मुख्याध्यापक पद रिक्त ठेवण्यात आले आहे. गावकऱ्यांनी केंद्र मुख्याध्यापक पदासाठी वेळोवेळी मागणी केली असताना देखील सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्हा परिषदच्या  वेगवेगळ्या अभियानातून पट वाढीसाठी प्रयत्न करून पुरेशी पटसंख्या करूनदेखील केंद्र मुख्याध्यापक पद रिक्त ठेवल्याने पालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने तातडीने याठिकाणी केंद्र मुख्याध्यापक देऊन केंद्र शाळेवरील शासकीय कामाचा तान कमी करावा व इतर शिक्षकांना अध्यापनासाठी पूर्णवेळ द्यावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.


No comments:

Post a Comment