![]() |
विठ्ठल पेडणेकर याला तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन सरपंच संघटनेच्या वतीने विभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर यांना देण्यात आले. |
मौजे डोणेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सर्वसामान्य शेतकरी जयसिंग प्रभाकर पाटील यांची फसवणूक करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित शिवशंभो प्रतिष्ठान व माँ फौडेशनचे विठ्ठल भरमू पेडणेकर (रा. पार्ले, ता. चंदगड) याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन नेसरी परिसरातील डोणेवाडी, तावरेवाडी, सरोळी, कुमरी, सांबरे, तारेवाडी,यमेहट्टी आदि गावातीतील सरपंच संघटनेने विभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर यांना दिले आहे. पेडणेकर याला अटक न केल्यास या सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ चंदगड पोलिस ठाणेसमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment