हलकर्णी श्री ग्रामदेैवत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणेश मुर्ती दान, उपक्रमाचे कौतुक - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2019

हलकर्णी श्री ग्रामदेैवत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणेश मुर्ती दान, उपक्रमाचे कौतुक

हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री ग्रामदैवत सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाचे कार्यकर्ते. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री ग्रामदैवत सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाने या वर्षी देखिल गणेश मुर्ती दान करुन समाजा समोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लॅस्टर ऑफ पॅरीसची मुर्ती नदित विर्सजित केल्यामुळे पाणि दुषित होते. हे पर्यावरणाला घातक आहे. त्यामुळे दरवर्षी मंडळाकडून मुर्ती दान केली जाते. गेल्या महिन्यात चंदगड तालुक्यात आलेल्या पुरस्थितीमुळे रोगराई पसरण्याची भिती वाढली आहे. त्यामुळे मंडळाने गावात कै. केदारी रेडेकर फौंडेशनच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.



No comments:

Post a Comment